orange city street
orange city street e sakal
नागपूर

'ऑरेंज सिटी स्ट्रीट' किती लांबणार? गरिबांना कमी किमतीत मिळणार घरे

राजेश प्रायकर

नागपूर : शहराच्या आकर्षणात भर घालणाराच नव्हे तर गरिबांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून देणारा ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’ प्रकल्प (orange city street project) अनेक वर्षांपासून रखडला आहे. मॉलच्या कामाला सुरुवात करून या प्रकल्पाला प्रारंभ झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला. परंतु, आता मॉलचेही काम संथगतीने सुरू असल्याने हा प्रकल्प आणखी किती लांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (when will orange city street project complete)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महापालिकेने साडेपाच किमी लांब ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’ प्रकल्प उभारण्याचा निर्धार केला. या प्रकल्पात ईडब्लूएस व एलआयजी कॉलनीसह मेडिकल हब प्रस्तावित आहे. अडीच हजार कोटींचा हा प्रकल्प असून पहिल्या टप्प्यात जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मॉल उभे करण्यात येत आहे. आठ मजली इमारतीत १० हजार वर्गमीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मॉलचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला महामेट्रो मॉल तयार करणार होता. परंतु, महापालिकेने मेट्रो विलंब करीत असल्याचे कारण पुढे करीत स्वतःकडे कामाचा ताबा घेतला. परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती बघता या मॉलचे काम संथगतीने सुरू आहे. मॉलचे काम सुरू करूनच ऑरेंज सिटी प्रकल्पाला प्रारंभ झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. परंतु, मॉलचेच काम दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पुढील कामे नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महापालिकेच्या अंदाजपत्रकाची शोभा वाढवित असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार की नाही? या प्रकल्पाचेही गोसेखुर्द प्रकल्पासारखे होणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मॉलनंतर हाउसिंग स्कीम -

या प्रकल्पात जयप्रकाशनगर येथे मॉल तयार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जयताळा परिसरात प्रकल्पातील प्लॉट क्रमांक १९ मध्ये ईडब्लूएस तर प्लॉट क्रमांक २० मध्ये एलआयजी कॉलनी प्रस्तावित आहे. याशिवाय मेडिकल हबही प्रस्तावित असून येथे येण्यास इच्छुक डॉक्टरांना केवळ इमारतीचा ढाचा देण्याचेही प्रस्तावित आहे. परंतु, मॉलच्या संथगतीमुळे संपूर्ण प्रकल्पच रखडला.

असा आहे प्रकल्प -

जागा - ३० हेक्टर

लांबी - ५.५ किमी

बांधकामाची किंमत - २५०० कोटी

मेट्रो मॉल - ५३ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT