Skin Care sakal
नागपूर

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

त्वचाविकाराचे उपचार महागडे आहेत. त्यामुळे गरिबांच्या ते आवाक्यात नाही. ही बाब लक्षात घेत त्वचाविकारावर वरदान ठरणाऱ्या ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्र खरेदीचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने घेतला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : त्वचाविकाराचे उपचार महागडे आहेत. त्यामुळे गरिबांच्या ते आवाक्यात नाही. ही बाब लक्षात घेत त्वचाविकारावर वरदान ठरणाऱ्या ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्र खरेदीचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने घेतला. येथील त्वचारोग विभागात हे यंत्र लावण्यात येणार होते, मात्र तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.

मेडिकलच्या त्वचारोग विभागात फ्रॅक्शनल सीओटू हे लेझर यंत्र खरेदीसाठी २०२१ मध्ये १५ लाख रुपये खर्चाची मंजुरी मिळाली होती. खरेदी प्रक्रियेला सुरवात झाली, नव्हेतर ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी त्वचारोग विभागातील वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने मुंबईला भेटही दिली होती.

जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून हे यंत्र खरेदी केले जाणार होते. मात्र १५ लाखांच्या निधीवर कोण्या दुसऱ्याच विभागाने डल्ला मारला. त्यामुळे त्वचारोग विभागाला हे यंत्र खरेदी करता आले नाही. यानंतर विभागाने सातत्याने पाठपुरावा केला, परंतु अद्यापही यश आलेले नाही.

आता किंमत झाली २० लाख

तीन वर्षांपूर्वी या यंत्रासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले होते. परंतु आता या यंत्राची किंमत २० लाख रुपये झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाल्यानंतर यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी पुन्हा सहा महिन्याचा कालावधी लागेल असे सूतोवाच प्राप्त झाले.

हे आहेत यंत्राचे फायदे

  • * नको असलेले केस

  • काढून टाकणे

  • * चामखीळ काढून टाकणे

  • * मोल्स काढून टाकणे

  • * मुरुमांचे डाग नाहीसे करणे

  • * शस्त्रक्रियेने चट्टे काढून टाकणे

  • * त्वचेचे अनावश्यक थर काढून टाकणे

  • * अवांछित डाग काढणे

  • * त्वचेत सुधारणा करणे

  • * खराब पेशी काढून टाकणे

  • * त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT