नागपूर

आमदार महोदय आपण आहात कुठे? रुग्णांची विचारणा; ऐन कोरोनाकाळात अनेक आमदार गायब

राजेश चरपे

नागपूर : लसीकरणापासून (Vaccination) तर बेड्ससाठी कोरोना रुग्ण (corona) व त्यांचे कुटुंबीय वणवण भटकत असताना स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे शहरातील आमदार (MLA) मात्र गायब झाले आहेत. जीवघेण्या काळात मोजके दोन ते तीन आमदार ॲक्टिव्ह दिसून असून इतरांनी होम क्वॉरंटाईन होऊन बचावात्मक पवित्रा घेतला असल्याचे दिसते. (where are MLAs in Nagpur asking corona patients )

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे रोज प्रसिद्धी पत्रक काढून सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनाही ते सोडत नाहीत. त्यांनी आपल्या प्रभागात भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या सौजन्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सर्व धामधुमीत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते महिन्याभरापासून दिसेनासे झाले आहेत. ते स्वतःच काही दिवस पॉझिटिव्ह होते. पहिल्या लाटेच्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप केले होते.

अलीकडे मात्र तेही थकले असल्याचे दिसून येते. मध्य नागपूरमध्ये लोकप्रतिनिधी आहेत की नाही असा प्रश्न मतदारांना पडला आहे. विकास कुंभारे खोपडे यांच्या कार्यक्रमात नाही तर नितीन गडकरी यांच्याच बैठकीला हजर असतात. प्रवीण दटके यांच्या रूपाने मध्य नागपूरला एक अतिरिक्त सक्रिय आमदार लाभल्याने मतदारांना थोडाफार दिलासा मिळत आहे. त्यांनी वजन वापरून आपल्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतले.

शहरात कुठे लस मिळत नसली तरी महालात मात्र हमखास मिळते. भाजपात अनेक दबंग नेते आहेत. मात्र ते काम करण्यात ‘प्रवीण' नसल्याने मतदारांची गैरसोय होत आहे. उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या समर्थकांच्या ‘संकल्प' संस्थेने गोरगरिबांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले. मात्र मंत्री म्हणून राऊत यांनी किमान आपल्या मतदारसंघात काही ठोस केल्याचे दिसत नाही.

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे दबंग आमदार विकास ठाकरे जिल्हा आणि महापालिकेच्या ढिम्म प्रशासनामुळे हतबल झाले आहेत. राज्यात आघाडीचेच सरकार असल्याने त्यांची अडचण होत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदार फंडातून ५० ॲँम्ब्युलंस घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. दक्षिण-पश्चिममध्ये माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच लोकप्रतिनिधी आहेत. ते ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

(where are MLAs in Nagpur asking corona patients )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT