file photo 
नागपूर

शिकावयाचे की कोरोनाचे काम करायचे, शिक्षकांचा सवाल

नीलेश डोये

नागपूर : शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे तर काही तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी शिक्षकांना करोनाचे काम करण्यास सांगितले आहे. एवढेच नव्हेतर गट विकास अधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस पंचायत समितीच्या कार्यालयात बसण्यास सांगितले आहे, त्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे आणि कुठले काम करायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

कोरोना संकटामुळे सध्या राज्यभरातील सर्वच शाळा बंद आहेत. परंतु अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश शासनाने दिलेत. दुसरीकडे शिक्षक व केंद्रप्रमुख सध्या कोरोनाच्या कामात आहेत. रामटेकचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशानुसार शिक्षक कोरोना सर्वे, खासगी दवाखान्यात उपस्थित राहून कोरोना रुग्णांची माहिती घेणे, ऑनलाईन शिक्षण देणे, गृहभेटीतून विद्यार्थ्यांचे गृहकार्य तपासणे, स्वयंसेवकांमार्फत शिक्षण देण्याचे काम करायचे आहे.

शिवाय गटशिक्षणाधिकारी रामटेक यांनी २ सप्टेंबर २०२० ला शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहून शैक्षणिक कार्य करण्याचे पत्र काढले. तर १० ऑगस्टला केंद्रप्रमुखांनी शाळा भेटी करून सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याचा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले.
कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शाळा सुरू ठेवणे याबाबत शासन स्तरावरुन कुठलेही पत्र नाही. गटशिक्षणाधिकारी रामटेक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या ११ सप्टेंबर २०२० पत्राचा संदर्भ दिलेला आहे. ११ सप्टेंबर २०२० ही तारीख यायचीच असून, ते चुकीचे असल्याचे निदर्शनास येत असल्याचे केंद्र प्रमुखांचे म्हणने आहे. 

याशिवाय शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून शैक्षणिक कार्य कसे करावे? केंद्रप्रमुखंनी शाळा भेटी कश्या कराव्या? नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे, याबाबत शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे शिक्षकांना स्पष्टपणे निर्देश देऊन त्यांच्यातील संभ्रम दुर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे भूपेश चव्हाण, प्रमोद लोणारे, टेमराज माले, महेंद्र पारसे, रामकृष्ण ढोके, संध्या झिले आदींनी सीईओ योगेश कुंभेजकर यांना दिलेल्या निवेदनात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT