Which board made a fuss about two different marksheet for the same girl? 
नागपूर

एकाच मुलीला दोन वेगवेगऴ्या गुणपत्रिका… वाचा कोणत्या मंडळाने केला घोळ

मंगेश गोमासे

नागपूर  : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या निकाल २९ जुलैला जाहीर करण्यात आला. या निकालात शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थिनीला दोन वेगवेगळ्या गुणपत्रिका मिळाल्याने शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे या दोन गुणपत्रिकांवरील एकच नाव आणि एकच बैठक क्रमांक असला तरी प्रत्येक विषयासाठी मिळालेले गुण वेगळे असल्याने शाळा प्रशासनही चकीत झाले आहे. या प्रकाराने शिक्षण मंडळाच्या कार्यशैलीवर आता टीका होऊ लागली आहे.

ऐन परीक्षेच्या दिवसातच राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने दहावीचा शेवटचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. यानंतर तपासणीसाठी बराच दिवस उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्याचे शिक्षण मंडळापुढे आव्हान होते. या आव्हानाला पेलत विभागाने विक्रमी वेळेत तपासणी आणि निकाल तयार करण्याचे काम केले. यातून शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल कमी दिवसात देण्याच्या प्रयत्नात मंडळाकडून चक्क गुणपत्रिका तयार करण्यात गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

शहरातील एका विद्यार्थिनीने ऑनलाईन निकाल शोधला. यावेळी बैठक क्रमांकाच्या मदतीने ऑनलाईन निकाल शोधला असता तिला सर्व सहावी विषयांमध्ये ३५ गुण मिळाल्याचे दिसून आले. यामुळे ती चकित झाली. सर्व विषयात सारखेच गुण मिळाले अशक्य आहे. त्यामुळे तीने शाळेत संपर्क केला. त्यानंतर पुन्हा बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका पाहण्यात आली असला वेगळी गुणपत्रिका हाती लागली. त्यामुळे शिक्षकही अचंबित झाले. या दोन्ही गुणपत्रिकीमध्ये विद्यार्थिनीचे नाव आणि बैठक क्रमांक सारखा आहे. मात्र, तिला मिळालेले सहाही विषयातील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. विद्यार्थांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत असा गोंधळ झाल्याने शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका होत आहे.
 

दहावीच्या गुणपत्रिकेबाबत असा कुठलाही तांत्रिक गोंधळ झाला असल्यास शाळेने आमच्याकडे लेखी अर्ज करावा. त्याची योग्य तपासणी होईल. विद्यार्थांचे कुठलेही नुकसान होणार नाही.

रविकांत देशपांडे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT