Which board students work hard in eleventh admission
Which board students work hard in eleventh admission 
नागपूर

अकरावी प्रवेशात कोणत्या बोर्डातील विद्यार्थ्यांचा लागणार कस....वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर  : दहावीच्या निकालात यंदा सीबीएसई विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यंदा राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून विभागाचा निकालही 93.84 टक्‍क्‍यावर म्हणजे 26.57 टक्के वाढल्याने याचा फायदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी दोन्ही मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी कस लागणार आहे.

अकरावी प्रवेशात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत दरवर्षी सीबीएसई दहावीचे विद्यार्थी सरस ठरतात असे चित्र असते. गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल 18 टक्‍क्‍यांनी पडला होता. सीबीएसई निकालातही अल्पशी घट झाली होती. यंदा राज्य मंडळाचा निकालात 26.57 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. शिवाय दोन्ही बोर्डात प्रथम स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सारखी आहे.

सीबीएसई दहावीचा निकालात शहरातून 99.4 टक्‍के गुण मिळवत ओजस खमेले याने प्रथम स्थान पटकावले. मॉडर्न स्कूलच्या आद्या पांडे हिने 99.2 टक्‍यासह दुसरे तर भारतीय विद्या भवनच्या त्रिमूर्तीनगर शाखेचा विनिल मोखाडे याने 99 टक्‍क्‍यासह तिसरा क्रमांक पटकावला. राज्य मंडळाच्या निकालात जे. पी. कॉन्व्हेंटच्या समिक्षा पराते हिनेसुद्धा 99.4 टक्‍क्‍यांसह प्रथम स्थान पटकावले आहे. यापाठोपाठ याच शाळेतील सानिका गोतमारे, सोमलवार निकालसचा हृषिकेश चव्हाण, साउथ पब्लिक स्कुलची हिमांश्री गावंडे यांनी 98.40 टक्‍क्‍यांसह संयुक्तपणे दुसरे स्थान मिळवले. शिवाय दोन्ही मंडळांनी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा प्रकारातील गुणांचा समावेश केल्यास त्यांची टक्केवारी 100 पेक्षा अधिक होण्याची शक्‍यता अधिक आहे.

राज्यातही हेच चित्र


राज्यात यावर्षी कला, क्रीडा प्रकारातील गुणांचा समावेश करुन 242 विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत. याशिवाय 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालामध्ये झालेली ऐतिहासिक वाढ आणि वाढत्या टक्केवारीमुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना यावेळी राज्यभरात अकरावी प्रवेशाची चुरस दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT