Which university is going to crack the level of rigor of the exam 
नागपूर

वाचा....कोणत्या विद्यापीठाकडून जातोय परीक्षेच्या काठिण्य पातळीला तडा

मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात येणार आहे. बहुपर्यायी पद्धतीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना १ तासात ५० पैकी केवळ २५ प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा केवळ ५० गुणांची असून उर्वरित ५० गुण हे महाविद्यालयांकडून आंतरिक गुण म्हणून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुणांची गरज असल्याने ऑनलाइन परीक्षेत जेमतेम गुण मिळवीत विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा मार्ग सुकर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व राज्य शासनाकडून आलेल्या शिफारशीची परीक्षा मंडळ व विद्वत परिषदेमध्ये चर्चा करून नागपूर विद्यापीठाने परीक्षेची पद्धतीची आखणी केली आहे. यानुसार ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. मूळ परीक्षा पद्धतीमध्ये ८० गुणांचा पेपर तर २० आंतरिक अशा पद्धतीने १०० गुणांची परीक्षा होते. मात्र, नागपूर विद्यापीठाने ५० प्रश्नांपैकी केवळ २५ प्रश्नांची उत्तरे सोडविणे, आणि ५० गुण हे महाविद्यालयांच्या हातात दिल्याने ही केवळ नाममात्र परीक्षा ठरणार आहे.

एकीकडे नागपूर विद्यापीठाने ५० टक्क्यांवर परीक्षा आणली असताना नजीकच्या गोंडवाना विद्यापीठानेही ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी ९० मिनिटांत ९० पैकी ८० प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे ८० गुणांची परीक्षा व २० गुण हे महाविद्यालयांच्या हातात असतील. अमरावती विद्यापीठाने परीक्षा पद्धतीची काठिण्य पातळी कायम ठेवली आहे. मात्र, नागपूर विद्यापीठाने परीक्षेत कुठलीही काठिण्य पातळी न ठेवता परीक्षेच्या नावावर विनोदच केल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT