crime esakal
नागपूर

Crime: नाली साफ करताना महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला; एका कर्मचाऱ्याचे बोट कापले

दिवसाढवळ्या मनपा कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: पावसाळी नाली स्वच्छतेची कामे करीत असताना महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तिघांनी गुप्ती व तलवारीने हल्ला केला. यात एका कर्मचाऱ्याचे बोट कापले तर एका कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली.

कर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव करीत पोलिस स्टेशन गाठले. अंबाझरी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याचे माहिती धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी दिली.

महापालिकेच्या धरमपेठ झोनमधील लोककर्म विभागाचे सातपुते व आरोग्य विभागाचे विक्रम चव्हाण यशवंतनगर परिसरात जेसीबीच्या सहाय्याने पावसाळी नाली स्वच्छ करीत होते.

दिवसाढवळ्या मनपा कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला

दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्वच्छतेचे काम करीत असताना अंबाझरी टेकडी येथील रहिवासी आरोपी समीर दुपारे, पीयूष काळबांडे, शैलेश ब्राह्मणे हे तिघे दारूच्या नशेत आले. त्यांनी मनपा कर्मचारी सातपुते व चव्हाण यांना शिवीगाळ केली.

यावरून वाद झाला. तिघेही आरोपी परत गेले अन् तलवार, गुप्ती अशी धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी सातपुते व चव्हाण यांच्यावर अचानर हल्ला केला. सातपुते व चव्हाण यांनी स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला.

हल्ल्यात सातपुते यांच्या हाताचे बोट कापले गेले तर चव्हाण यांच्या डाव्या हाताला मार लागला. दोन्ही घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी अंबाझरी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटली.

अंबाझरी पोलिसांनी आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. जखमी सातपुते व चव्हाण यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने महापालिका कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT