While taking a bribe of fifty thousand Talathi was caught red handed 
नागपूर

पन्नास हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात; रंगेहात पकडल्यावर सांगितले अजबच कारण

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : जमिनीच्या सातबारावर नाव चढविण्यासाठी शेतकऱ्याकडून पन्नास हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने राजस्व विभागात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव आशीष अरुण गोगलकर (वय ३४) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, तलाठी गोगलवार हा कामठी तालुक्यातील वरंभा येथे कार्यरत आहे. तक्रारकर्ता शेतकरी आहे. या शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेती झरप येथे आहे. आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर तक्रारकर्त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाचे नाव सातबारावर चढविण्यासाठी वरंभा येथील तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन अर्ज केला होता. सगळी कागदपत्रे घेऊन तक्रारकर्त्याने १३ नोव्हेंबर रोजी तलाठी कार्यालयात जाऊन तलाठ्याची भेट घेतली.

तलाठी आशीष याने त्वरित काम करण्यासाठी पन्नास हजारांची शेतकऱ्याला लाच मागितली. तक्रारकर्त्या शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. निरीक्षक योगिता चाफले यांनी गुप्त पद्धतीने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत आशीषकडून लाच मागत असल्याचे सिद्ध झाले. तलाठी आशीष याने तक्रारकर्त्यास मंगळवारी दुपारी रक्कम घेऊन येण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी दोघांमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे शेतकरी घटनास्थळी पोहोचले. तलाठी आशीष याने शेतकऱ्याकडून लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रचलेल्या सापळ्यात तलाठी अडकला. घटनास्थळी इशारा करताच एसीबीच्या पथकाने तलाठी आशीष यास रंगेहाथ पन्नास हजाराची लाच घेताना पकडले.

तलाठ्याच्या विरोधात मौदा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पथकाने तलाठी आशीषच्या घराची चौकशी सुरू केली आहे. एसपी रश्‍मी नांदेडकर, ॲडिशनल एसपी राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, विनोद आडे, कॉंस्टेबल रविकांत डहाट, अनिल बहीरे, मंगेश कलंबे, आशीया अली व विनोद नायगमकर यांचा या कारवाईत सहभाग होता.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT