Who is doing it, mind you to get admission ... Read more 
नागपूर

कोण करीत आहे, प्रवेश मिळवून देण्यासाठी मनधरणी...वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. मात्र, या प्रवेश प्रक्रियेपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांचा विश्‍वास खासगी शिकवणी वर्गांवर अधिक असल्याचे दिसून येत आहे. क्‍लासमधील विद्यार्थ्यांचे अधिकाअधिक प्रवेश मिळावेत यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांसह संस्थाचालक मोठ-मोठ्या शिकवणी वर्गासमोर लोटांगण घालत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया नाममात्र ठरण्याची चिन्हे आहेत.

शिकवणी वर्गांवर आळा बसावा यासाठी राज्यभरातील पाच शहरांमध्ये दोन वर्षांपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेला छेद देत क्‍लासेसमधून अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश झाल्याचे चित्र दिसून आले. याचा अनेक नामवंत महाविद्यालयांना फटका बसला.

आता निकालात वाढ झाली आहे. तसेच मेरीटही वाढले. मात्र, यावर्षी कुठलीही जोखीम न घेता छोट्या कनिष्ठ महाविद्यालयांपासून तर शहरातील बड्या कनिष्ठ महाविद्यालयांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांतील प्राचार्य आणि संस्थाचालक खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्यांकडे जाऊन प्रवेशासाठी विनवणी करत आहेत. शहरातील काही नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केल्यास हे तथ्य निश्‍चित बाहेर येईल.


क्‍लास ठरवितात प्रवेश
दहावीनंतर ‘करिअर‘ साठी खासगी शिकवणी वर्गाकडे पालकांची धाव असते. त्यामुळे महाविद्यालय कुठले असले तरी शिकवणी वर्ग चांगला असावा असाच पालकांचा कल आहे. यामुळे अकरावीचे वर्ग सुरू होण्याआधीच खासगी शिकवणी वर्गांमध्ये पालकांची गर्दी असते. याचा फायदा घेत शिकवणी वर्ग घेणारे कुठला विद्यार्थी कुठे प्रवेश घेईल, हे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?

Uttar Pradesh Education : शाळांमध्ये धडकणार सरकारी पथकं! योगी सरकारचा मोठा प्लॅन; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Horoscope : आज दोन शक्तिशाली राजयोगांच्या संयोगामुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; अडचणी दूर अन् लक्ष्मी घरात भरेल पाणी

Back Pain Relief : पाठ व कंबरदुखी !

ढिंग टांग : गलगोटिया पाळा, अज्ञान टाळा..!

SCROLL FOR NEXT