Who is playing with the lives of the corona victims? 
नागपूर

कोण करीत आहे कोरोनाबाधितांच्या जीवांशी खेळ? वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित वाढत आहेत. यातील पाच हजारांवर बाधित घरीच आहेत. मात्र, यातील किती लोकांना उपचार मिळत आहे, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आठ-आठ दिवस बाधितांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण घरांमध्येच खितपत पडले आहे.

सुशिक्षित तसेच आर्थिकदृष्ट्या सबळ असलेले बाधित फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. मात्र, कुठलेही मार्गदर्शन तसेच पैसा नसल्याने अनेक जण घरांमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपचाराबाबत प्रतीक्षा करीत आहे. एकूणच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात वर करून बाधितांच्या जीवांशी खेळ सुरू केल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या कोरोनाबाबत चाचणीसाठी शहरात ५० केंद्रे सुरू आहेत. येथे दररोज पाच हजारांवर चाचण्या होत असून हजारो बाधित आढळून येत आहेत. पालिकेने चाचणी केंद्रे सुरू केली मात्र पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना पूर्णपणे वाऱ्यांवर सोडल्याची घटना धरमपेठ झोन कार्यालयाच्या पाचशे मीटर अंतरातच पुढे आली आहे.

धरमपेठेत कुटुंबातील एक ज्येष्ठ नागरिक आठ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर २८ ऑगस्टला त्यांची पत्नी व मुलगी पॉझिटिव्ह आढळून आली. त्यांची पत्नी व मुलीने खाजगी लॅबमध्ये तपासणी केली होती. महापालिकेने खाजगी लॅबसंचालकांना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती देणे बंधनकारक केले आहे. परंतु या कुटुंबाकडे गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेचा एकही कर्मचारी फिरकला नाही.

त्यांना योग्य उपचार मिळतो की नाही? ते उपचार घेत आहेत की नाही? याबाबत कुठलीही चौकशी अद्याप करण्यात आली नसल्याचे या ज्येष्ठ नागरिकाने ‘सकाळ`सोबत बोलताना नमूद केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांची गर्दी असलेल्या झोन कार्यालयाजवळच सेवा मिळत नसेल तर दाभा, हजारी पहाड या दूरवरच्या ठिकाणचे नागरिक कुठल्या स्थितीत असतील, असा सवाल या नागरिकाने विचारला आहे. केवळ धरमपेठच नव्हे तर दहाही झोनमध्ये हिच स्थिती आहे.

रुग्णवाढीस मनपाचाच हातभार?
पॉझिटिव्ह रुग्णांना कर्मचाऱ्यांकडून कुठलेही मार्गदर्शन नसल्याने यापैकी अनेकजण शहरात बिनधास्त फिरत आहेत. पालिकेने त्यांच्यावर कुठलेही बंधन न लावल्याने त्यांच्यामार्फत संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकप्रकारे पालिकाच कोरोनाबाधित वाढविण्यास हातभार लावत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘उपचारासंबंधी जनजागृती करावी`
पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेवर मोठा ताण आहे. प्रत्येकाला सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने घरीच असलेल्या बाधितांसाठी निदान, उपचारासंबंधी जनजागृती करावी, असे या ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. अनेक गरिबांना सल्ल्यासाठी डॉक्टरकडे जाता येत नाही किंवा डॉक्टर पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाजवळ फिरकुही देत नाहीत, असे ते म्हणाले.

झोन अधिकाऱ्यांची कर्तव्याकडे पाठ
एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याची माहिती झोन कार्यालयात गोळा केली जाते. रुग्णांना दाखल करण्यासाठी झोनल अधिकाऱ्यांकडून संबंधिताला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. घरीच उपचार घेत असलेल्यांची माहिती घेऊन त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आहे. परंतु, यातील एकही जबाबदारी पार पडली जात नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT