Who took the news of Commissioner Mundhe? Read on 
नागपूर

आयुक्त मुंढेंचा कुणी घेतला खरपूस समाचार ? वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संचालक मंडळाची मंजुरी नसताना बळजबरीने, असंवैधानिक पद्धतीने, बेकायदेशीररित्या सीईओ कसे झाले? असा प्रश्‍न उपस्थित करीत महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रातून आयुक्तांचा खरपूस समाचार घेतला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हेतुपुरस्सरपणे बट्ट्याबोळ करीत असून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा करण्यासाठी आयुक्त जबाबदार आहेत, असा घणाघात महापौरांनी केला. महासभेच्या पूर्वसंध्येला महापौरांच्या आरोपामुळे उद्या, शनिवारी होणाऱ्या सभेत प्रशासकीय भूकंप होण्याची शक्‍यता आहे. 


काल, महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या (एनएसएससीडीसीएल) पाच संचालकांसह कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत अनेक आश्‍चर्यकारक मुद्दे पुढे आले. त्यामुळे महापौर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी 24 तासांत सहा महिन्यांतील निर्णयाची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

स्मार्ट सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीतून महापौरांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. स्मार्ट सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीतून आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी झालेले नियुक्तीही अवैध असल्याचे महापौरांनी नमुद केले.

संचालकांची नियुक्ती संचालक मंडळाच्या बैठकीत होते. मात्र, आयुक्त आले तेव्हापासून संचालक मंडळाची एकही बैठक झाली नाही. अशा स्थितीत आयुक्त संचालक व सीईओ कसे झाले, असा प्रश्‍नही महापौरांनी उपस्थित केला. प्रवीण परदेसी या कंपनीचे चेअरमन असून कंपनी कायद्याप्रमाणे संचालक मंडळाची मंजुरी नसताना चेअरमन मौखिक किंवा लेखी स्वरुपातही कुणालाही सीईओ नियुक्त करू शकत नाही, ही बाब कर्तव्यदक्ष आयुक्तांना माहिती नाही, याबाबत महापौरांनी आर्श्‍चय व्यक्त केले.

संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेऊन आयुक्तांनी फसवणूक केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या निविदा रद्द केल्या, स्मार्ट सिटीचे 50 कोटी बायोमाईनिंगसाठी वापरले, संचालक मंडळाने केलेल्या नियुक्‍त्या रद्द करीत अनेकांना प्रकल्पातून बाहेर काढले, कंपनीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महापालिकेचा प्रभार दिला, याबाबतचे अधिकार तुम्हाला कुणी दिले? असा सवालही महापौरांनी आयुक्तांना केला. प्रसुती रजा नाकारून महिला अधिकाऱ्यांबाबत आयुक्तांचा दृष्टीकोन योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. याप्रकरणी आयुक्तांना प्रतिक्रियेसाठी 'मेसेज' केला असता त्यांची कुठलीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. 

'पदाचा गैरवापर' 
स्मार्ट सिटीत जे काही सुरू आहे, त्यावरून आयुक्त पदाचा गैरवापर करीत आहेत, असा आरोपही महापौर संदीप जोशी यांनी केला. आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी अनेक गंभीर आरोप केले. आर्थिक अनियमिततेवरही महापौरांनी बोट ठेवले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT