Who warned Commissioner Mundhe? 
नागपूर

आयुक्त मुंढेंना आता कुणी दिला इशारा ?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. 2 : सभागृहात संपूर्ण पुरावे दिल्यानंतरही आयुक्त तुकाराम मुंढे डॉ. प्रवीण गंटावार व त्यांच्या पत्नी शिलू गंटावार यांच्यावर कारवाई करण्याचे टाळत आहे. गंटावार दाम्पत्यांवर आयुक्तांचे प्रेम का? असा सवाल करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी कारवाई न केल्यास आयुक्तांविरोधात जनआंदोलन करणार, असा इशारा दिला. एवढेच नव्हे तर डॉ. गंटावाराबाबतची एक "ऑडिओ क्‍लिप' सार्वजनिक करणार असल्याचेही ते म्हणाले. 

महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सत्तापक्षनेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे आदी उपस्थित होते. सभागृहापूर्वीच आयुक्त मुंढे यांना स्वर्गीय मदन थूल यांनी डॉ. गंटावारांच्या प्रतापाची पूर्ण फाइल दिली. परंतु, आयुक्तांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. शासकीय सेवेत असताना खासगी रुग्णालय चालविणे, डॉ. गंटावार यांच्या पत्नी डॉ. शिलू या मध्य प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत.

डॉ. शिलू दर शुक्रवारी मध्य प्रदेशातील बैतुल येथील रुग्णालयात सेवा देतात. मात्र, महापालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांची हजेरी डॉ. प्रवीण गंटावार लावतात. या बाबी पुराव्यासह आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. ऍन्टी करप्शन ब्युरोने डॉ. गंटावार दाम्पत्यावर अपसंपदेबाबत गुन्हा नोंदविला. मात्र, 24 तास उलटूनही आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही.

कुठल्या दबावात डॉ. गंटावार दाम्पत्यावर कारवाई करीत नाही, ते आयुक्तांनी स्पष्ट करावे, असेही दयाशंकर तिवारी यांनी नमूद केले. डॉ. गंटावार यांनी विमा दवाखान्यासाठीही खोटी बिले सादर केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनीही ताशेरे ओढले आहे. गंटावार दाम्पत्याला निलंबित न केल्यास आयुक्तांविरोधात जनआंदोलन उभे करणार असल्याचेही तिवारी म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

CM Yogi Adityanath: योगींचा नवा अवतार! अर्थसंकल्प मांडताच बदलला सोशल मीडियाचा फोटो; ब्रह्मोस मिसाइलसोबतचा तो फोटो काय सुचवतोय?

SCROLL FOR NEXT