Who Will Be WCL CMD 
नागपूर

आज ठरणार वेकोलिचा "बॉस'

राजेश रामपूरकर

नागपूर :  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदासाठी उद्या गुरुवारी (ता. 23) मुलाखती घेण्यात येणार आहेत. दिल्ली येथे या मुलाखती होणार असून आठ उमेदवार रिंगणात आहेत. सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाची चमू या मुलाखती घेणार आहे. या पदावर वर्णी लागावी म्हणून जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चर्चा आहे. 

विद्यमान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राजीव रंजन मिश्रा असून त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2020 पर्यंत होता. त्यांना सध्या एक वर्षाची मुदतवाढ मिळाली असून ते 31 डिसेंबर2020 पर्यंत या पदावर राहणार आहेत. मिश्र यांनी जानेवारी 2014 मध्ये या पदाचा कार्यभार घेतला होता. निवड समितीने निवडलेल्या उमेदवाराला एक जानेवारी 2021 ला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे उद्याच दुपारपर्यंत नवीन अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाच्या शर्यतीत वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडचे संचालक (प्रशासन) डॉ. संजय कुमार, वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) मनोज कुमार, महानंदा कोलफिल्ड लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) ओमप्रकाश सिंग, इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे संचालक (तांत्रिक) बी. वीरा रेड्डी, सेंट्रल माईन प्लानिंग ऍण्ड डिझाइन इन्स्टिट्यूटचे संचालक (तांत्रिक) सत्येंद्रकुमार गुमास्ता, इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे महाव्यवस्थापक सुकुमार दलपती, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक संतोषकुमार झा, सिक्‍युरिटीज ऑफ प्रिंट ऍण्ड मिंटचे रमाकांत दीक्षित यांचा समावेश आहे.

डॉ. संजय कुमार व मनोजकुमार यांनी दहा दिवसांपूर्वी झालेल्या महानदी कोलफिल्ड लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाच्या मुलाखती दिल्या होत्या. मात्र, कंपनीला पात्र उमेदवार न मिळाल्याने कोणाचीही निवड झाली नसल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे वेस्टर्न कोलफिल्डचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT