RTMNU. 
नागपूर

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कोण आणणार प्रस्ताव...वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. शुक्रवारी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी प्राधिकरणावर खापर फोडले. तसेच प्राधिकरणांनी भूमिका घेण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर आता अभाविप आणि शिक्षण मंचने त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पीएच.डी. संदर्भात नेमण्यात आलेल्या डॉ. दिलीप पेशवे समितीच्या अहवालावर चर्चा होणार असल्याचे कळते. दरम्यान याच बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षेवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

28 जुलै रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत अतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधी सुरू असलेल्या कलगीतुऱ्याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. केवळ नागपूरच नव्हे तर इतर विद्यापीठांमध्येही अभाविप आणि शिक्षण मंच त्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे. शिक्षण मंचाकडून विद्वत परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय बैठकीत पीएच.डी. दिशानिर्देशासंदर्भातील डॉ. दिलीप पेशवे समितीच्या अहवालावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, विद्वत परिषदेच्या विषयपत्रिकेवर अंतिम परीक्षेसंदर्भात अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नसला तरी या संदर्भात वेळेवर प्रस्ताव येण्याची शक्‍यता आहे.

 सविस्तर वाचा - प्रस्तावित बायोइथेनॉल प्रकल्प मकरधोड्यातच होणार...दुसऱ्या मतदारसंघात पळवण्याचा होता प्रयत्न

शिक्षणमंच सक्रीय
राज्यपालांच्या भेटीदरम्यान या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी प्राधिकरणाच्या भूमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे शिक्षणमंचने यासंदर्भात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय अभाविपनेही यासाठी कंबर कसली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT