file photo 
नागपूर

कोण पाठविणार पंतप्रधानांना २ कोटी पोस्टकार्ड? वाचा सविस्तर

मंगेश गोमासे

नागपूर ः देशात कोरोनामुळे भयानक बेरोजगारी निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेहमी जनतेची दिशाभूल केली असून दिलेले कोणतेही वचन पूर्ण केले नसल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. केंद्राच्या धोरणांविरोधात संघटनेकडून पंतप्रधानांना २ कोटी पोस्टकार्ड पाठवून ‘रोजगार दो‘ अशी मागणी करण्यात येणार आहे. याच निमित्ताने जीपीओ पोस्ट ऑफिस येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात अभियानास सुरुवात केली.

पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटी, तरुणांना रोजगार, पेट्रोल डिझेलची किंमत कमी करणे, महागाई कमी करणे या निर्णयाशिवाय पंतप्रधानांनी केलेले कोणतेही वचन पूर्ण केले नाही. सर्व पूर्णपणे अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे युवक कॉंग्रेसद्वारे मोहीम तरुणांना जागृत करण्यासाठी आणि बेरोजगारीविरोधात आवाज उठविण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

त्यातूनच देशातील वाढती बेरोजगारी आणि केंद्र सरकारकडून रोजगाराची मागणी लक्षात घेता युवक कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून दोन कोटी "रोजगार दो" चे पोस्ट कार्ड पाठविण्याची तयारी केली आहे. त्या अंतर्गत आज नागपुरातील जीपीओ चौकातील पोस्ट ऑफिस सुरू करून पंतप्रधानांना एक पोस्टकार्ड पाठविण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंग, इरशाद शेख, धीरज पांडे, प्रणित जांभुळे, आसिफ शेख, पीयूष वाकोडीकर, सतीश पाली, गौतम अंबाडे, सचिन वासनिक, चेतन तारारे, निलेश खोब्रागडे, प्रतीक कोल्हे, प्रणयसिंग ठाकूर, शेख सरनवाज, ईश्वर निचवानी, आकाश इंदूरकर, कुणाल निमगे, गणेश धुर्वे, निखिल सहारे, गोविंद गोरे, सुदेश बैसारे, राकेश इखर सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

Uchgaon Gram Panchayat news : ‘त्या’ मिळकती महापालिकेच्या हद्दीत उचगाव ग्रामपंचायतीला धक्का, सर्वोच्‍च न्यायालयाने स्थगिती उठवली

Latest Marathi News Live Update : शासकीय कर्मचारी संघटनेच्या संपाचा तिसरा दिवस, कामकाज ठप्प

"ती खूप खुश झाली" राकेश बापटने सांगितली एक्स वाइफ रिद्धीची प्रतिक्रिया; म्हणाला..

तुमचे पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का? पावसाळ्यापूर्वी पाण्याचा ‘हेल्थ चेकअप’ करण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT