nagpur-high-court High Court
नागपूर

भीम आर्मीच्या मेळाव्याला परवानगी का नाकारली? नागपूर खंडपीठ

कोरेगाव-भीमा लढाईतील शहिदांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव-भीमा लढाईतील शहिदांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

नागपूर : भीम आर्मी सामाजिक संघटनेतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला परवानगी का नाकारली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या(mumbai high court) नागपूर खंडपीठाने(nagpur bench) राज्य शासनाला केली. सहाय्यक पोलिस आयुक्तांनी परवानी नाकारल्यानंतर भीम आर्मी संघटनेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, भीम आर्मी (bheem army )संघटनेतर्फे कार्यकर्ता मेळाव्यासह कोरेगाव-भीमा(koregaon bhima) शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

रेशीमबाग मैदानावर(reshimbaug ground) ‘प्रबोधन गीते व मानवंदना’ या नावाने १ जानेवारी २०२२ रोजी आयोजित केला आहे. विशेष शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. याबाबत २२ डिसेंबर रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी महानगरपालिकेने, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी वाहतूक विभागाने आणि ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर सुधार प्रन्यासने परवानगी दिली. कोरेगाव-भीमा लढाईतील शहिदांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीला रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सशर्त परवानगी देण्यात आली होती. असे असताना यावर्षी पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. पोलिस प्रशासनाचा हा आदेश अवैध व एकतर्फी आहे. आदेश जारी करण्यापूर्वी सुनावणीची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे, न्यायालयाने आदेश रद्द करून कार्यक्रमाला परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT