Why did the commissioner fall alone?
Why did the commissioner fall alone? 
नागपूर

आयुक्त मुंढे का पडले एकाकी ?

राजेश प्रायकर

नागपूर : स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वच संचालकांपैकी काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी नियमावर बोट ठेवत सीईओपदी नियुक्तीच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला विरोध केला. एवढेच नव्हे नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनीही त्यांची कोंडी केली. त्यामुळे संपूर्ण बैठकीत आयुक्त एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले. केवळ सेनेच्या नगरसेविकेने त्यांच्या प्रस्तावाला समर्थन केले. 

महापौर व आयुक्तांच्या वादानंतर नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची बहुप्रतिक्षित बैठक आज पार पडली. बैठकीत चेअरमन प्रवीण परदेसी यांनी आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्तांची पंचाईत झाली. विशेष म्हणजे आयुक्तांनी स्मार्ट सिटी सीईओपदी स्वतःच्या नियुक्तीचा प्रस्ताव स्वतः मांडला.

यावर महापौर संदीप जोशी यांनी आश्‍चर्य व्यक्त करीत विरोध केला. त्यानंतर सीईओपदी आयुक्तांच्या प्रस्तावावर चेअरमन प्रवीण परदेसी यांनी प्रत्येक संचालकाला विचारणा केली. यात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या एचआर धोरणानुसार सीईओपदी नियुक्ती करावी, असे मत मांडले.

विशेष म्हणजे एचआर धोरणात पूर्णवेळ सीईओ नसल्यास डेप्युटी सीईओकडे प्रभार देता येईल, असे स्पष्ट आहे. त्यानंतर महापौर जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे यांनीही पूर्णवेळ सीईओ नियुक्तीपर्यंत डेप्युटी सीईओकडे प्रभार देण्याची मागणी केली.

या संपूर्ण बैठकीत आयुक्त मुंढे एकाकी पडल्याचे दिसून आले. केवळ सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आयुक्तांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. परंतु त्यांनीही नियमाप्रमाणे निर्णय घेण्याचे सांगितले. 

अन्‌ आयुक्त बैठकीतून निघाले 
अपेक्षेप्रमाणे सीईओपदाचा निर्णय न झाल्याने आयुक्त बैठक संपुष्टात येताच लगेच सर्वप्रथम बाहेर पडले. बैठकीतही प्रवीण परदेसी यांचा अपवाद वगळता ते फारसे कुणासोबत बोलले नाही, असे सुत्राने नमुद केले. 

समर्थक लागले कामाला 
आयुक्तांची सीईओपदी नियुक्ती झाली नसली तरी सोशल मिडियावर त्यांच्या समर्थकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. एका समर्थकाने आयुक्तांच्या समर्थनात रस्त्यांवर उतरणाऱ्या लोकांना फोनवर कॉल करण्याचेही आवाहन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT