file 
नागपूर

मृत्यूपूर्वी लाडक्‍या "प्रिशा'ने का म्हटले "सॉरी'?

सकाळ वृत्तसेवा

दवलामेटी (जि.नागपूर) : आठवा मैल परिसरातील सिद्धार्थ सोसायटीतील सुमंत गुणवंत पाटील या अकरावीतील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 16) उघडकीस आली. तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये "सॉरी' म्हणून माफी मागितली. मृत्यूचे नेमके कारण न कळल्यामुळे विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत.
 

प्रिशा गेली होती शिकवणीवर्गाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिशा पाटील आयुध निर्माणी अंबाझरीच्या केंद्रीय विद्यालयात अकरावीची विद्यार्थिनी होती. रविवारी (ता. 16) दुपारी एकच्या सुमारास शिकवणी वर्गाला गेली. नंतर सायंकाळी साडेपाचला घरी परतली. लगेच ती तिच्या खोलीत गेली. तेव्हा तिचे आजोबा आणि आई घरीच होती. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री साडेनऊला तिचे वडील घरी आले. त्यांनी मुलीबद्दल विचारणा केली. आईने अभ्यास करत असल्याचे सांगितले.

अन्‌ आईने फोडली किंकाळी
थोड्या वेळाने वडिलांनी मुलीला जेवणासाठी बोलाविले. दरवाजा आतून बंद असल्याने आईने प्रिशाला हाक दिली. वारंवार हाक देऊनही काहीच प्रतिक्रिया न आल्याने आईने खिडकीतून बघितले असता प्रिशाने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी किंकाळी फोडली. शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. लगेच वाडीतील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्‍टरने प्रिशाला मृत घोषित केले. प्रिशाने आत्महत्येपूर्वी "सुसाइड नोट' लिहिली होती. त्यात तिने "सॉरी' म्हणून सर्वांची माफी मागीतली. वाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT