Abhay Karandikar News sakal
नागपूर

Abhay Karandikar News : संशोधन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याची गरज - प्रा. अभय करंदीकर

विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्‍घाटन शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणखी वाढविण्याची गरज आहे, असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे फायदे अधिकाधिक समाज घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. देश म्हणून स्टार्टअप्समध्ये मोठी मजल मारली असली, तरी बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात आपण पुरेसे गंभीर नाही.

शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठीची गुंतवणूक आणखी वाढविण्याची गरज आहे, असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‍घाटन प्रसंगी प्रा. करंदीकर बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे प्रमुख डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते.

यावेळी अधिवेशनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘विज्ञान भारतीने सातत्याने समाजात वैज्ञानिक संस्कार रुजवण्याचे कार्य केले आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील ऋषी हे त्या काळातील संशोधकच होते.

आरोग्य, स्थापत्य, वास्तूनिर्माण, प्रशासन, औषधनिर्माण, शल्यचिकित्सा अशा कित्येक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे’’. डॉ. विजय भटकर यांनी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने आपल्या आचरणात विज्ञाननिष्ठेचा स्वीकार केला, तर आपोआपच तो सार्वत्रिक होईल, असे मत मांडले. डॉ. शेखर मांडे यांनी कोविड काळातील भारताची कामगिरी, चांद्रयान मोहीम आणि अयोध्येतील मंदिर निर्माण यावरील वैज्ञानिक पृष्ठभूमी स्पष्ट केली.

भारताची भूमिका मुळातच ज्ञानमय, विज्ञानमय आहे. सातत्याने विकासाकडे नेणारी अध्यात्मयात्रेची वैज्ञानिक प्रयोगशाळाच जणू आपल्या ऋषींनी, तत्त्वज्ञांनी आणि संतांनी शतकानुशतके उभारलेली आहे,

जी विश्वकल्याणाचा संदेश देत सदैव पुढे जात राहील, असे मत डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले. डॉ. कौस्तुभ साखरे यांनी आभार आणि डॉ. तृप्ता ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. श्री. विवेकानंद यांनी संस्थेचा अहवाल सादर केला.

सुरेश सोनी यांचे बीजभाषण

‘समग्र विकासाची भारतीय संकल्पना व विज्ञान भारतीची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत सुरेश सोनी यांचे बीजभाषण झाले. ‘विकासाची संकल्पना अधिकाधिक अर्थपूर्ण करण्यासाठी जुनी व कालबाह्य प्रतिमाने टाकून दिली पाहिजेत.

विज्ञान, तंत्रज्ञानाचे विवेकपूर्ण साह्य घेत, विश्वकल्याणाचा संदेश देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला, तरच जागतिक शांतता आणि सातत्यपूर्ण विकासाचे स्वप्न साकार होईल. विश्वकल्याणाची भावना आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार करण्याची गरज आहे’, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT