HIGH COURT nagpur SAKAL
नागपूर

उद्योगांना वीज सबसिडी बंद का? : उच्च न्यायालय

उद्योजकांना विजेच्या दरात व अन्य बाबींत सवलत देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील उद्योजकांना देण्यात आलेली विजेवरील सबसिडी अचानक बंद का करण्यात आली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली. तसेच यावर तीन आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश उद्योग मंत्रालय, विकास आयुक्त (उद्योग) यांना दिले. याआधारे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष आशिष चंद्राणा आणि अन्य काहींनी शासनाच्या या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान दिले.

याचिकेनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश हे प्रदेश तुलनेने अविकसित आहेत. येथे प्रोत्साहन देण्याच्या आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने येथील उद्योजकांना विजेच्या दरात व अन्य बाबींत सवलत देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले. यासाठी विकास आयुक्त (उद्योग) यांनी राज्य वस्त्र धोरणाची सन २०१८ ते २०२३ अशी आखणी केली. यामध्ये सूतगिरणी, प्रक्रिया उद्योग आणि वस्त्र उद्योगाला प्रतियुनिट २ रुपये सवलत दिली जाणार होती.

२१ डिसेंबर २०१८ रोजी याबाबत शासन निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आला. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या संकटाचे कारण पुढे करीत राज्य सरकारने ही सवलत देणे बंद केले. शासनाने २०२३ पर्यंतचे धोरण आखल्यामुळे अनेक उद्योजकांनी मोठी गुंतवणूक केली होती. न्यायालयाने सर्व बाजू विचारात घेत प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ विधिज्ञ एस. व्ही. मनोहर आणि अँड. हर्निश गढिया यांनी यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT