Why will a qualified professor launch a degree burning movement? ... Read more 
नागपूर

पात्रताधारक प्राध्यापक का करणार पदवी जलाओ आंदोलन ?...वाचा सविस्तर

मंगेश गोमासे


नागपूर : राज्यात अनेक वर्षांपासून सहायक प्राध्यापक भरती न झाल्याने हजारो नेट, सेट, पीएच.डी. झालेल्या पात्रताधारकांना तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून पदभरती करण्याची मागणी करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्रताधारक युवक-युवती बेरोजगारीचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून शिक्षकदिनी प्रतीकात्मक ‘पदवी जलाओ आंदोलन’ आणि ‘शिक्षकदिन हा भक्षकदिन’ म्हणून साजरा करीत शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

दहा वर्षांहून अधिक कालावधीपासून राज्यात प्राध्यापक भरती झालेली नाही. राज्यात ३० हजारांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. असे असतानाही शासनाला यांचे गांभीर्य नाही. याउलट महाविद्यालयांमध्ये केवळ कंत्राटी प्राध्यापकांच्या नेमणुका करून तुटपुंज्या मानधनावर प्राध्यापकांकडून काम करून घेतले जात आहे. राज्य शासनाने प्राध्यापक भरती करण्याचे अनेकदा मान्य करूनही कानाडोळा केला आहे.

पात्रताधारकांच्या विविध संघटनांच्या वतीने शासनाला निवेदन देत अनेकदा प्राध्यापक भरती करण्यासाठी मागणी करण्यात आली. मात्र, त्याला बगल देण्यात आली.
आंदोलनामध्ये राज्यातील कला, वाणिज्य विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, सामाजिकशास्त्र आदी अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षित बेरोजगार सहभागी होणार आहेत. याशिवाय तासिका, कंत्राटी, अतिथी प्राध्यापकांच्या राज्यातील ३२ संघटना सहभागी होणार आहेत. यामध्ये छात्रभरती विद्यार्थी संघटना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा समावेश आहे. पोलिस विभाग किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळालेल्या ठिकाणी दहा ते पंधरा व्यक्ती जमा होत प्रतीकात्मक सामूहिक पदवीचे दहन केले जाणार आहे. याशिवाय कोरोनामुळे इतरांनी त्यांच्या घरीच राहून पदवीचे दहन करावे व त्याची चित्रफीत आणि छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT