Galfas Galfas
नागपूर

पती पूर्ण करू शकला नाही इच्छा; पत्नीने उचलला टोकाचा पाऊल

अनिल कांबळे

नागपूर : घरातील आर्थिक अडचणीमुळे दिवाळीत डायनिंग टेबल घेऊन देण्याचे आश्‍वासन पतीकडून पूर्ण झाले नाही. परंतु, पत्नीने डायनिंग टेबलसाठी हट्ट धरत गळफास लावून आत्महत्या केली. संगीता राजन पाटील (४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, संगीता पाटील या हुडकेश्वरमधील बेसा परिसरातील टेक ऑफ सिटीच्या सी विंगमध्ये राहत होत्या. संगीता या गृहिणी असून पती राजन पाटील हे खाजगी नोकरी करतात. काही महिन्यांपासून संगीता या घरात डायनिंग टेबल घेण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी पतीला वारंवार हट्ट केल्यानंतर दिवाळीत डायनिंग टेबल घेऊन देईल, असे आश्‍वासन पतीने दिले.

दिवाळी सणाची खरेदी झाल्यानंतर संगीता यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलबाबत विचारणा केली. परंतु, दिवाळीत झालेला खर्च बघता त्यांनी आणखी काही दिवस थांबण्यासाठी पत्नीची मनधरणी सुरू केली. परंतु, ती समजून घ्यायला तयार नव्हती. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी पतीकडे डायनिंग टेबलसाठी हट्ट धरला होता. पतीने डायनिंग टेबल घेऊन देण्यास दिलेला नकार संगीता यांच्या जिव्हारी लागला.

संतापलेल्या संगीता यांनी शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पती राजन शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे. घरगुती सामानासाठी जिद्द करून ती पूर्ण न झाल्यामुळे आत्महत्या करण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT