Wildlife Record esakal
नागपूर

Wildlife Record : बुद्धपौर्णिमेला निसर्ग अनुभवाचा मुहूर्त चुकला

Wildlife Record : तारखेतील घोळामुळे यंदा २३ ऐवजी २२ मे रोजी होणार वन्यप्राण्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Wildlife Record : बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम (प्राणी गणना) हे समीकरण झालेले आहे. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येत असते. यावर्षी २३ तारखेला बुद्धपौर्णिमा असतानाही तो कार्यक्रम २२ मे रोजी घेण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धपौर्णिमेचा मुहूर्त चुकला असल्याची चर्चा रंगली आहे.

मुहूर्त चुकल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर कनिष्ठांकडे विचारणा करून त्यांची कानउघाडणी केली. तारखेत २२ ऐवजी २३ मे असा बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्याने २२ मे रोजीच निसर्ग अनुभव कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे.

वन्यजीवप्रेमींसाठी आनंददायी अनुभव

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात प्राणी गणनेसाठी खास मचाणांची व्यवस्था करण्यात येत आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय आनंदाचा असतो. पाणवठ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात तेथे येणाऱ्या प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे.

बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना

उन्हाळ्यातच प्राणीगणना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी जिथे पाणी तिथे प्राणी आवर्जून जातात. बुद्ध पौर्णिमेला उन्हाळ्यातील सर्वाधिक चंद्रप्रकाश असलेली रात्र असते. जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात. त्यामुळे त्यांच्या नोंदी घेणे शक्य होते.

अशी होते गणना

  • जंगलातील पाणवठ्यांनुसार विभाग केले जातात

  • प्रत्येक पा‌णवठ्यावर एक लपण किंवा मचाण उभारले जाते

  • एका मचाणावर वनकर्मचारी आणि एक प्राणीप्रेमी बसतो

  • दुपारी दोन ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत सलग निरीक्षण केले जाते

  • पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचा प्रकार, नर किंवा मादी आणि वेळ याची नोंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT