winter session nagpur winter session the work will start from 19 December sakal
नागपूर

Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे!

उपमुख्यमंत्री फडणवीस आग्रही : १९ डिसेंबरपासून कामकाज होणार सुरू

नीलेश डोये

नागपूर : नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला होत असते. किमान सहा आठवड्यांचे अधिवेशन अपेक्षित असताना अलीकडच्या काळात दोन आठवड्यांत सूप वाजते. यंदा मात्र अधिवेशन तीन आठवड्यांचे होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहे. अधिवेशनाचे कामकाज १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशनासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे दोन वर्ष अधिवेशन नागपुरात झालेच नाही. कोरोनाची लाट ओसरल्यावर अर्थसंकल्पी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागणीने जोर धरला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसा मानस व्यक्त केला होता. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणासाठीची व्यवस्था नसल्याने कारण देत ते मुंबईत घेण्यात आले. आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. १९ डिसेंबरपासून अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार आहे. तयारीसाठी ९५ कोटींचा खर्च करण्याचा आराखडा बांधकाम विभागाने तयार केला आहे.

अधिवेशन तीन आठवड्यांचे असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. तीन आठवडे कामकाज चालेल, या दृष्टिकोनातूनच प्रशासनाकडून तयारी करण्यात येत असल्याचे समजते. फडणवीस विदर्भातील असल्याने अधिवेशन अधिक काळ चालविण्याचा प्रयत्न आहे. विरोधत किती सहकार्य करतात, हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण एकूणच मंत्री, आमदारांसह अधिकाऱ्यांना नवीन वर्षाचे स्वागत नागपुरात कराव लागणार असल्याचे दिसते.

विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे अधिवेशनाचे कामकाज जास्त दिवस चालले नाही. त्यामुळे अनेक आमदारांना त्यांच्या भागातील प्रश्न, समस्या मांडता आल्या नाही. अधिवेशन मुंबईत झाल्याने विदर्भाच्या प्रश्नांनाही पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. भाजपने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा रेटून धरला होता. त्याचा फायदाही त्यांनी झाला. दोन वर्षानंतर अधिवेशन येथे होत असल्याने विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिवेशन एक आठवडा अतिरिक्त घेण्याची तयारी त्यांची आहे.

अधिकाऱ्यांची अडचण

मुंबई, पुण्याकडील अधिकाऱ्यांना विदर्भात राहण्याची इच्छा नसल्याचे उदाहरण अनेकदा समोर आले आहे. तीन आठवडे अधिवेशन चालल्यास सर्वांना नागपुरातच मुक्काम ठोकावा लागणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

Latest Marathi News Live Update: रयत शिक्षण संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील निर्माणधीन इमारतीचा स्लॅब कोसळला

Horoscope Prediction : 1 फेब्रुवारीला बनतोय रवी पुष्यचा अत्यंत शुभयोग; या पाच राशींना मिळणार भरभरून लाभ

Dhule News : सावधान! मृत किंवा अपात्र सदस्यांची नावे स्वतःहून कमी करा, अन्यथा धुळे जिल्हा प्रशासनाचा कारवाईचा इशारा

IND vs NZ, 5th T20I: काळजी करू नका संजू सॅमसन..., टॉस जिंकल्यावर सूर्यकुमारने जाहीर केले प्लेइंग इलेव्हनमधील मोठे बदल

SCROLL FOR NEXT