woman cannot sell property for 15 years stamp duty news 
नागपूर

खरेदी, विक्रीच्या व्यवहारात महिलांना १ टक्का सूट; मात्र, करावे लागणार या नियमांचे पालन

नीलेश डोये

नागपूर : मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात महिलांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महिलांच्या नावे खरेदी व्यवहार असल्यास मुद्रांक शुल्कातून एक टक्का सूट मिळणार आहे. याचा लाभ घेतल्यास मालमत्ता त्यांना किमान १५ वर्ष विक्री करता येणार नाही. ३१ मार्च लक्षात ज्यांनी आधीच मुद्रांक शुल्काची रक्कम भरून ठेवली, त्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मालमत्ता, वस्तू, साहित्याची खरेदी महिलांच्या नावे फारच कमी होते. मालमत्ता तर फारच कमी महिलांच्या नावे आहे. वडिलोपार्जित मालमत्तांमध्येही महिलेला हिस्सा कमी मिळतो किंवा त्यासाठी भांडावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात सातबारावर महिलांचे नाव चढविण्यास प्राधान्य देण्यात आले होते.

महिलांसाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यांच्या प्रोत्साहनासाठी अनेक उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. आता सरकारने महिलांच्या नावे मालमत्ता करण्यावर त्यांना ती खरेदीकरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. महिलांनी मालमत्ता खरेदी केल्यास किंवा त्यांच्या नावे ती खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट मिळणार आहे. फ्लॅट, वैयक्तिक बंगला, रो-हाऊस, स्वतंत्र घराच्या खरेदी व्यवहारातच मिळणार आहे.

परंतु, ही मालमत्ता कोणत्याही पुरुष खरेदीदारास किमान १५ वर्षांच्या कालावधीसाठी विक्री करता येणार नाही. तसे केल्यास मिळालेली एक टक्का सूटही दंडाच्या स्वरूपात संबंधित महिला विक्रेत्याकडून वसूल करण्यात येईल. ही सूट एक एप्रिलपासून लागू होणार आहे. ३१ मार्च लक्षात ज्यांनी आधीच मुद्रांक शुल्काची रक्कम भरून ठेवली, त्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुद्रांक शुल्क सहा टक्के

मुद्रांक शुल्कात देण्यात आलेली सूट ३१ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता इतर सर्व महानगर पालिका क्षेत्र, सर्व नगर परिषद क्षेत्र व प्रभाव क्षेत्रात सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येतील. तर ग्रामीण भागात पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल.

रेडीरेकनर जैसे थे

वर्ष २०२१-२२ साठी रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रकमेत कोणताही बदल होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT