woman caught doing chain snatching in Nagpur umred  
नागपूर

सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेस पळ काढताना भाजीवाल्यांनी पकडले; उमरेडमधील घटना 

सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर): सोमवार दिवस म्हणजे उमरेड शहरातील आठवडी बाजाराचा दिवस. तालुक्याचे ठिकाण तसेच विधानसभा क्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, मजूरवर्ग खरेदीसाठी व अन्य कामाच्या निमित्ताने येत असतात. 

बाजारात भाजीविक्रेत्यांसोबतच इतर व्यापारी आणि खरेदीदार एकच गर्दी करतात. त्याच गर्दीचा फायदा घेत काही चोरटे बाजारात शिरकाव करतात. त्या चोरांच्या टोळीत महिलाही असतात. खरेदीदार वस्तू विकत घेण्यास मग्न असतो. अगदी त्याचवेळेस चोर त्यांच्याजवळील महागडे मोबाईल फोन, सोन्याचे दागिने खरेदीदारास बेमालूमपणे चोरून घेतात आणि मग सुरू होतो 

आरडाओरडा. त्या बाजाराच्या परिसरात पोलिसांचादेखील राबता असतो, पण चलाख चोर त्यांना ‘चकमा’ देत चौर्यकर्म सिद्धीस नेतात. अशीच एक घटना सोमवारी घडली. 

तेव्हा मंगळवारी पेठेतील फिर्यादी महिला पुष्पा किशोर जिसनानी (वय-६०) संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास भाजी खरेदी करीत असताना आरोपी महिला चंद्रकला राजू पात्रे (वय५०, मेडिकल चौक , झोपडपट्टी नागपूर) हिने फिर्यादी महिलेची १५ ग्रॅम वजनाची ७५ हजार बाजारमूल्य असलेली सोनसळी हिसका मारून चोरत असताना फिर्यादी महिला तसेच भाजीविक्रेत्यांनी तिला रंगेहात पकडले. पोलिसांना सूचना देऊन कारवाईनंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तिची रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology : डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 3 सर्वोत्तम गुण; पण एका कमतरतेमुळे आयुष्यभर जवळच्या लोकांना ठेवतात दुःखी

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Numerology Prediction : समाज अन् कुटुंबात खूप नाव कमवतात 'या' मूलांकाचे लोक; मिळवतात भरपूर पैसा-यश-आदर, पहा तुमचा मूलांक

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT