crime
crime e sakal
नागपूर

पोलिस कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार, फेसबुकवरून झाली होती मैत्री

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोलिस शिपायाने लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार (woman physical abuse case) केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. फेसबुकवरून दोघांची ओळख झाली होती. आरोपीने वेगवेगळी कारणे पुढे करीत पीडितेकडून लाखो रुपयेसुद्धा उकळले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी (gittikhadan police nagpur) पोलिस शिपायाविरूद्धा गुन्हा दाखल (nagpur crime) केला असून तो शहर पोलिस मुख्यालयात क्यूआरटी पथकात तैनात आहे. (woman physically abused by police in nagpur)

आशिष प्रकाश काळसर्पे (२८) रा. पोलिस लाइन टाकळी असे पोलिस शिपायाचे नाव आहे. कोराडी हद्दीत राहणारी पीडित महिला इव्हेंट मॅनेजरचे काम करते. तिचे पहिले लग्न झाले असून १४ वर्षाची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने २००९ साली तिने पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर गोवा येथे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करू लागली. आजारी आईची देखभाल करण्यासाठी ती परतली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची आशिषसोबत ओळख झाली. काही दिवसानंतर पीडितेच्या आईचा मृत्यू झाला. भावनिक काळात त्याने जवळीक साधली. बॉडी बिल्डर असून जिममध्ये लोकांना प्रशिक्षण आणि डायट प्लॅन तयार करून देत असल्याचेही त्याने सांगितले. २८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित महिला त्याच्या घरी गेली. त्याने दिलेली कॉफी पिताच महिला घामाघूम झाली. आशिषने तिला हॉलमधील बेडवर आराम करण्यास सांगितले. ती शुद्धीत नसताना आशिषने लैंगिक शोषण केले. पीडितेने जाब विचारताच लग्न करण्याचे आमिष दाखवीत तिला शांत केले. दुसऱ्याच दिवशी मंगळसूत्र, कुंकू, मिठाई घेऊन आशिष तिच्या घरी गेला. गळ्यात मंगळसूत्र घालून आणि डोक्यात कुंकू लावून लग्न केल्याचा देखावा केला. दरम्यान, त्याने वेगवेगळी कारणे पुढे करीत लाखो रुपये उकळले. सोबत लैंगिक शोषणही सुरू ठेवले. पीडितेने कायदेशीर लग्नाचा आग्रह धरला असता २६ मे रोजी महिलेने लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आशिष काळसर्पेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT