file photo 
नागपूर

महिला बालकल्याण समितीचा ‘तो‘ ठरावच बोगस?, वाचा काय झाला प्रकार

नीलेश डोये

नागपूर : कोरोना असेपर्यंत अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव महिला व बालकल्याण समितीने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. असा ठरावच झाला नसल्याचे सूत्रांकडून सांंगण्यात आले असून, विभागाकडूनही त्याची पुष्टी करण्यात आली. कुठलाही अतिरिक्त भत्ता मिळणार नसल्याने अंगणवाडी सेविकांचा हिरमोड होणार असल्याचे बोलले जात आहे. समितीकडून अंगणवाडी सेविकांच्या भावनाशी खेळ करण्यात आल्याची टीका होत आहे.

मौदा नगर पंचायतअंतर्गत कार्यरत असणारी अंगणवाडीसेविका कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये दहशत पसरली. २२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्यापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रशासनाच्या कामात मदत करीत आहे. घराघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सेविकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने त्यांना एक महिन्याचा १००० रुपये प्रोत्साहन भत्ताही दिला आहे. तर महिला व बाल कल्याण समितीने कोरोना असेपर्यंत अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला १००० रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असा ठराव घेतला.

पॉझिटिव्ह असलेल्या सेविकांच्या मानधनात कपात करण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे दिली होती. परंतु असा ठरावच झाला नसून फक्तच घोषणा करण्यास आली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधला असता ठरावाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. महिला बाल कल्याण सभापती बोढारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT