women empowerment save girl 
नागपूर

मुलगी झाली म्हणून जन्मदात्रीच्या नावाने खडे फोडणे बंद करा

आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही

सकाळ वृत्तसेवा

आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात धडाडीने कार्य करीत आहे, असे असले तरी सर्वच ठिकाणच्या महिलांच्या बाबतीत हे खरे ठरणार नाही. कारण ग्रामीण, दुर्गम भागात आजही महिलांना चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित जीवन जगावे लागते.

मुलीचा जन्म झाल्याने जन्मदात्रीच्या नावे खडे फोडणारे आजही अनेक आहेत. महिला अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनात मी सदैव अग्रेसर असते. त्याच दिशेने वाटचाल करणारे ‘सकाळ’चे ‘एक दिवा कन्येसाठी, तिच्या उज्ज्वल उद्यासाठी’ अभियान अतिशय चांगले आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात कन्यापूजन केले जाते. त्यामुळे खास मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय योग्य आहे. प्रत्येक महिला आणि कुटुंबाने या विधायक कार्यात हिरिरीने सहभागी झाले पाहिजे. कारण आमच्या चिमुकलीच्या जन्माचे स्वागत झाले, तिचा सन्मान झाला तरच खऱ्या अर्थाने आदिशक्तीचा गौरव केल्यासारखे होईल.

लोककल्याणाच्या कार्यात ‘सकाळ’चा नेहमीच पुढाकार असतो. यापूर्वीही ‘सकाळ’ने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधीलकी जपली. त्यामुळे ‘एक दिवा कन्येसाठी तिच्या उज्ज्वल उद्यासाठी’ अभियानात मी सहभागी झाले. तुम्हीसुद्धा लावणार ना एक दिवा तिच्यासाठी...

- नवनीत राणा, खासदार, अमरावती लोकसभा मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'कार्यतपस्वी नेतृत्व हरपले', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

सलमान खानला नेमकं झालंय तरी काय? अभिनेत्याचं तब्बल १६ किलो वजन झालंय कमी; खरं कारण समोर

UP PET 2026: UP PET 2026 चे नोटिफिकेशन जाहीर; आता एकाच स्कोअरवर 3 वर्षे भरतीसाठी अर्ज करता येणार

Marathi Live Updates News: मिरज पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीत भाजपची बाजी

Duleep Trophy: टीम इंडियातून ब्रेक, तरीही दिलीप ट्रॉफीत अभिषेक शर्माला संधी नाही; उत्तर विभागाचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT