Work to supply uniforms to specific individuals The Speaker avoided the inquiry 
नागपूर

गणवेश पुरवठ्याचे काम विशिष्ट व्यक्तींना? सभापतींनी टाळली चौकशी

नीलेश डोये

नागपूर : समग्र अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गणवेश निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश खरेदी करण्यात आला असता तरी विशिष्ट पुरवठादारांकडून घेण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. याची सखोल चौकशी झाल्यास मोठी अनियमितता समोर येणार असल्याचे सांगण्यात येते.

शिक्षण सभापती भारती पाटील यांनी चौकशी टाळत फक्त बिलाच्या पावत्या सादर करण्याचे सूचना केल्या असून काहींच्या इशाऱ्यावरूनच शिक्षण संघटनाही यात उडी घेतल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. गणवेशाचा विषय सुरवातीपासूनच वादात राहिला. अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांनी शिक्षण समितीने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वमर्जीने गणवेश खरेदी केला.

विशेष म्हणजे शिक्षण समितीच्या  बैठकीत हा विषय चर्चेला आला. सदस्यांच्या तक्रारीनंतर पाटील यांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु त्यांनी चौकशी टाळत ज्या शाळांनी गणवेश खरेदी केले, त्या शाळांकडून गणवेशाच्या बिलाच्या पावत्या व गणवेशाचा फोटो सादर करण्याच्या सूचना शिक्षण सभापती पाटील यांनी बीईओंना दिल्या.

सभापती पाटील यांनी कुणालाही गणवेश पुरवठ्याचे कंत्राट दिले नसल्याचे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणवेश काही मोजक्याच व्यक्तींकडून खरेदी करण्यात आल्या. त्यामुळे चौकशी झाल्यास सर्व पितळ उघड पडण्याची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे चौकशी टाळण्यात आल्याची चर्चा आहे.

पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर बैठक

गणवेशाच्या विषयावर एका पदाधिकाऱ्याच्या बंगल्यावर बैठक झाली. यावेळी तीन सभापतींसह दोन पुरवठादार व काही सदस्य उपस्थित होते. चर्चेतील नेमकी माहिती कळू शकली नाही तरी गणवेशाच्या विषयावर पडदा टाकण्यावर भर देण्यात आल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT