World Book Day 2024 esakal
नागपूर

World Book Day 2024 : प्लेझर बॉक्स हे मनात दडलेलं, मनाची कवाडं उघडणारं पुस्तक

World Book Day 2024 : प्लेझर बॉक्स हे पुस्तक व. पु. काळे यांनी आपल्या वाचकांना लिहिलेल्या पत्र संवादाचा उत्तम नमुना आहे.

सकाळ वृत्तसेवा

मी वाचलेलं पुस्तक - प्लेझर बॉक्स (लेखक - व. पु. काळे)

लीना फलके ढेंगे (उपजिल्हाधिकारी, भंडारा)

World Book Day 2024 : प्लेझर बॉक्स हे पुस्तक व. पु. काळे यांनी आपल्या वाचकांना लिहिलेल्या पत्र संवादाचा उत्तम नमुना आहे. यातील काही वाचकांना व. पु. प्रत्यक्ष भेटलेले आहेत. तर काही वाचकांनी केवळ त्यांची पुस्तके वाचलेली आहेत. व. पु. काळे यांची अनेक पुस्तके ही मानवी दैनंदिन जीवनातील घटनांवर मानसोपचारिक पद्धतीने केलेली विश्‍लेषण आहेत. त्यांचं आकलन विचारप्रवृत्त करणारं आहे. त्यांच्या कोणत्याही पुस्तकातील उतारा वाचत असताना वाचक स्वतःभोवती घडणाऱ्या घटना त्या चित्रणात पाहायला लागतो.

त्यातूनच मग व. पु. त्यांना आपल्या मनातील गोष्टी शेअर करण्यायोग्य व्यक्ती अथवा निकटवर्ती वाटायला लागतो. म्हणूनच हे पुस्तक अंतर्मनाचा वेध घेणारे आहे. मनाचा मनाशी होणारा संवाद म्हणजे पत्र, जी आजच्या काळात कालबाह्य होतात की काय अशा धास्तावलेल्या स्थित्यंतरात सापडलेली आहेत.

पुस्तकातून काय प्रेरणा मिळते?

स्मार्टफोन, इंटरनेट, समाजमाध्यमांच्या, रील्स आणि यूट्युब अशा आधुनिक साधनांच्या गराड्यात माणूस माणसाला संवादाशी पारखा झालेला आहे. फोनद्वारे संवाद होत असल्याने पत्र तर आज दूरची गोष्ट झाली आहे. गेली कित्येक वर्ष लोकांनी पत्रच लिहिलेली नसतील हे सर्वव्यापी कटू सत्य आहे.

एकेकाळी दहा दहा पानांची पत्रे मी माझ्या मैत्रिणींना लिहित असे. त्यातून मन मोकळं व्हायला आणि आपल्या मनाची कवाडं व त्यात काय दडलयं हे समजायला हे माध्यम पुन्हा मी स्वतःसाठी खुलं केलं आहे. पुस्तके, ग्रंथ, लेख, कविता हे वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी पत्र लिहिण्याची संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे आज गरजेचे झाले आहे. तरच वाचन संस्कृतीला बळ मिळेल.

माझं ऑल टाईम फेव्हरेट पुस्तक : एक होता कार्व्हर (लेखिका वीणा गवाणकर)

वाचलीच पाहिजे अशी पुस्तके :

१) कृष्णा काठ - यशवंतराव चव्हाण

२) शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख

३) रानवाटा - मारुती चितमपल्ली

४) कृष्ण किनारा - अरुणा ढेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT