World Rabies Day World Rabies Day
नागपूर

World Rabies Day : लसीकरण मोहिमेअभावी मोकाट प्राण्यांचा बळी

नीलेश डाखोरे

नागपूर : शहरात व ग्रामीण भागात नेहमीच मोकाट श्वान स्वच्छंद विहार करताना दिसतात. मोकाट श्वानांना सुद्धा मानवाप्रमाणेच स्वतंत्रतेचे संवैधानिक अधिकार व कायद्याने संरक्षण प्राप्त आहे. कायद्याचे ज्ञान व जनजागृती नसल्या कारणाने मोकाट श्वानांना पकडण्यासाठी नेहमीच नागरिक महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषदेला तक्रारी देत असतात. परंतु, आपणास माहीत आहे का? मोकाट श्वानांना फक्त ABC rule 2001 नुसार नसबंदी अभियानासाठी रेस्क्यू केले जाऊ शकते. नसबंदी व रेबीज टिकाकरण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आवासात परत सोडण्याचा कठोर कायदा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार श्वान चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचाराविषयी शासन, प्रशासन जनजागृती अभियान राबवीत नसल्याने अज्ञानापोटी जगभरात दरवर्षी ५९ हजारांपेक्षा अधिक लोक आपले प्राण गमावतात. नागपूर शहरात २०२० मध्ये पाळीव श्वान, रस्त्यांवरील श्वान १,३६९ लोकांना चावले आहेत. तर वर्ष २०२१ मध्ये २,१९६ लोकांना चावले आहेत. हा आकडा नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांचा आहे. परंतु, यात रेबीज श्वान चावल्याची निश्चित आकडेवारी नाही.

२८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून पाळला जातो. शासन, प्रशासनातर्फे मोकाट प्राण्यांचा विषय गंभीरतेने घेतला जात नाही. मोकाट श्वानांच्या हितासाठी रेबीज लसीकरण मोहीम राबविली जात नसल्यामुळे मोजक्या मोकाट श्वानांना रेबीज हा पशुजन्य आजार होतो. त्यामुळे मोकाट प्राण्यांचा हकनाक बळी जातो. प्राण्यांना दुसरीकडे अथवा जंगलात सोडणे, विष देणे, हत्या करणे, जखमी करणे, प्राण्यांचा छळ करणे कायद्याने गुन्हा आहे. असे कृत्य करणाऱ्या नागरिकांवर पशुक्रूरता निवारण अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार पोलिस गुन्हा दाखल करू शकतात.

रेबीज म्हणजे काय?

रेबीज हा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही रेबीज संक्रमित श्वान चावल्यामुळे होतो. रेबीज हा रोग कोल्हा, लांडगा, तडस, वटवाघूळ, मुंगूस, घुबड या सगळ्या जंगली प्राण्यांत तसेच गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, उंट, घोडा, श्वान यासारख्या पाळीव प्राण्यांनाही होण्याची शक्यता असते. रेबीज रोगाचे विषाणू हे अतिसूक्ष्म ३०-३०० नॅनोमीटर लांब आणि ७०-७५ नॅनोमीटर रुंद असून, त्यांचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असतो.  हे विषाणू बाधित प्राण्याने चावा घेतल्यानंतर त्यांच्या लाळेतून जखमेत शिरतात तेथून मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात. तेथे विषाणूंची वाढ होते व नंतर ते लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथीत स्थिरावतात. त्यानंतर लाळेच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो.

रोगाची लक्षणे

  • हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही रेबीज संक्रमित श्वान चावल्यामुळे होतो

  • श्वान चावल्यानंतर तीन ते आठ आठवड्यांत या रोगाची लक्षणे दिसून येतात.

  • काही वेळेस हा कालावधी १२ ते २३ महिने किंवा त्याहीपेक्षा अधिक महिन्यांचा किंवा वर्षांचा आढळून येतो. 

  • प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही या रोगाची लक्षणे आढळतात.

  • ताप येणे, डोके व अंग दुखणे, स्नायू अडकणे, भूक मंदावणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, पोटाचा दाह होणे अशी लक्षणे दिसून येतात

  • माणसांमध्ये जसजसा आजार वाढत जातो तसतशी संवेदनशीलता जास्त प्रमाणात दिसून येते.

  • प्रकाश, आवाज व पाणी यांची भीती निर्माण होते.

  • पाण्याची जास्त प्रमाणात भीती निर्माण होणे याला हायड्रोफोबिया म्हणतात.

  •  रेबीजच्या प्रादुर्भावामुळे नाडीचे ठोके वाढतात, बाहुल्या विस्फुरतात, बुबुळे मोठी होतात, डोळ्यांतून पाणी येते, माने व जबड्याभोवतालचे स्नायू आकडे गेल्यामुळे तोंडातून लाळ व फेस येतो, श्‍वसनास त्रास होऊन रुग्ण कोमात जाऊन मृत्यू होतो.

रेबीज श्वान चावल्यावर उपाययोजना

  • श्वानाने चावा घेतलेली किंवा ओरखडलेली कोणतीही जखम असो,

  • ती सर्वप्रथम पाणी व साबणाने दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत स्वच्छ धुवा

  • एक टक्का पोटॅशिअम परमॅंगेनेटचे द्रावणही धुण्यासाठी वापरता येईल

  • यानंतर जंतुनाशक लावा

  • लगेचच दवाखान्यात जाऊन डॉक्‍टरांच्या सल्ल्याने श्वान चावल्यानंतरचे लसीकरण करून घ्या

लसीकरणाचे दोन प्रकार

  • श्वान चावण्यापूर्वी लसीकरण करणे

  • श्वान चावल्यानंतर लसीकरण करणे

नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, पशुसंवर्धन विभाग यांनी मोकाट प्राण्यांच्या संरक्षणार्थ रेबीज लसीकरण मोहीम, श्वान निर्बीजीकरण मोहीम, रेबीज जनजागृती मोहीम, कायद्यांचे पालन करून युद्धास्तरावर राबविणे काळाजी गरज आहे. शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्राण्यांना रेबीज आजार उध्दभवतो व त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. नागरिकांमध्ये रेबीज लसीकरणाविषयी जनजागृती व्हावी जेणेकरून अज्ञानापोटी रेबीज श्वान दंश होणाऱ्यांचा मृत्यू होणार नाही. रेबीज लस, इमूनुग्लोबिन इंजेक्शन, टीटीनस इंजेक्शनचा मोठा साठा महानगरपालिकेच्या दवाखान्यात, शासकीय रुग्णालयात, प्राथमिक स्वास्थ केंद्रात नेहमी उपलब्ध असावा यासाठी शासनाने प्रशासनाने लक्ष द्यावे. कायद्यांचे पालन करून श्वान नसबंदी मोहीम युद्धस्तरावर प्रत्येक गाव शहरात राबविण्यात यावी.
- स्वप्नील बोधाने, पर्यावरण प्रेमी, नागपूर
रेबीज ग्रसीत प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो. रेबीज प्रतिबंधासाठी रेबीज विरोधी लसीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला शून्य दिवस असे म्हटले जाते. त्यानंतर तीन, सात, १४ आणि २८ व्या दिवशी रेबीजविरोधी लस घेतल्यास रेबीज होण्याचा धोका टाळता येतो. प्राण्यांना सुद्धा अशाच प्रकारे लसीकरण करण्यात येते. पशुचिकित्सक, पशुप्रेमी, प्राण्यांच्या सहवासात कार्य करणाऱ्यांनी रेबीज लसीकरण अवश्य करावे.
- डॉ. मयूर काटे, पशुचिकित्सक सर्जन, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT