वानाडोंगरी ः तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसलेली म्हातारी व बाळाला कडेवर घेऊन मोठ्या आशेने आलेली आयेशा जड अंतकरणाने परत गेली.  
नागपूर

"या' गरजू लाभार्थ्यांकडे पाहून अधिका-यांना काहीच वाटत नाही का हो !

विनायक इंगळे

वानाडोंगरी (जि.नागपूर) मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनने त्रस्त झालेली जनता किती दिवस झळ सोसणार आहे. घरातील होते नव्हते ते सारं संपणार असल्याने व पुन्हा चौथा लॉकडाउन लागणार असल्यामुळे सहनशीलता संपलेली जनता हिंगणा तहसील कार्यालयात समस्या घेऊन येत आहे. परंतु, कुणीही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसल्यामुळे तक्रार सोबत घेऊन आलेले तक्रारदार रिकाम्या खुर्च्या पाहून आल्या पावली परत जात आहेत.

अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे बंधन नाही
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळाला. पाच दिवसांचा आठवडा झाला. सकाळी9.45 ही यायची वेळ असताना 11.45 पर्यंत कार्यालयात एक ते दोन कर्मचारी आले होते. तक्रारी ऐकायलाच तहसील कार्यालयात कुणी संबंधित अधिकारी नसल्यामुळे जनता संतप्त झाली. पण कुणाला सांगणार? प्रतिनिधीने "ऑन द स्पॉट' सकाळी सव्वादहाला तहसीलमध्ये भेट दिल्यानंतर चपराशी कार्यालय उघडून बसला होता. एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. चार-पाच महिला कार्यालयाच्या पायरीवरच बसून होत्या. 10.20नंतर पुरवठा निरीक्षक मनोज लटारे आले. तिडकेबाबू आले 11.15.ला.. संकिर्ण शाखेच्या दोन महिला कर्मचारी आल्या 11.30या वेळेला. प्रस्तुतकार 11.43 ला ऐटीत आले. त्यानंतर नायब तहसीलदार आल्याबरोबर 12वाजता. पुन्हा दोन महिला कर्मचारी आले. प्रतिनिधी12 पर्यंत कार्यालयात थांबले. तोपर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार महादेव दराडे यायचे होते. संजय गांधी शाखेत, पुरवठा विभागात कुणीही नव्हते. येथील कर्मचारी यांच्यावर तहसीलदारांचे दुर्लक्ष असल्यामुळे दोन-दोन तास कर्मचारी उशिरा येतात. संजय गांधीच्या पैशाचे चौकशीसाठी किन्हीवरून एक सत्तर वर्षांची म्हातारी रुखमा सोनवाने दोन तासांपासून ताटकळत बसून होत्या. त्या गावावरून पायदळ आल्या होत्या. "खायला नाही रेशन, जायला नाही साधन' अशी जनतेची अवस्था झालेली आहे.

"ती' बाळाला घेउन आली उन्हातच पायदळ परत गेली
वानाडोंगरी नगर परिषदेत चकरा मारून थकून गेले, पण कार्ड नसल्यामुळे रेशन मिळाले नाही. म्हणून शेवटी तहसीलदाराकडे आले. चौकशी केल्याबरोबर रडायला लागले. त्यांना आर्थिक मदत दिली. एका लहानशा बाळाला कडेवर घेऊन अमरनगर येथील आयेशा बबलू शेख कार्यालयात ही महिला आली अन्‌ पायदळ परत गेली. बाहेरगावी जाणारे, रेशनची समस्या घेऊन दुपारी बारापर्यंत शंभरच्यावर लाभार्थी, तक्रारकर्ते आले आणि परत गेले. तेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन जनतेला न्याय द्यावा. सातवा वेतन, पाच दिवसांचा आठवडा करूनही कर्मचारी दोन-दोन तास उशिरा येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

Nagpur Sports News: कबड्डीने धरली आधुनिकतेची कास; सुनेत्रा पवार : छत्रपती शिवाजी महाराज करंडक कबड्डी स्पर्धेला सुरुवात

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

IPL 2026, RR vs DC: अडखळलेल्या दिल्लीला स्टार्कच्या पुनरागमनाचा दिलासा; आज राजस्थानशी लढणार; पाहा कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT