Suicide  
नागपूर

दहावीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास 

अनिल कांबळे

नागपूर : घरात कुणीही नसताना दहावीच्या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना अजनीत आज पहाटे उघडकीस आली. विशाखा हर्षल फुलझेले (वय 15, रा. फुलमती लेआउट, अजनी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा ही दहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील खासगी कंपनीत नोकरीवर आहेत तर आई गृहिणी आहे. रविवारी तिचे वडील बाहेर गेले होते तर आई शेजाऱ्यांकडे गेली होती. लहान बहिण बाहेर खेळत होती. यादरम्यान विशाखाने आपल्या बेडरूममध्ये स्लॅपच्या व्हेंटिलेटरच्या ग्रीलला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आई घरी आल्यानंतर तिला विशाखा दिसून आली नाही. तिला आवाज दिला असता बेडरूममधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने बेडरूमचा दरवाजा ढकलला असता विशाखा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विशाखाच्या आत्महत्या कारण अद्याप कळू शकले नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मंत्री होऊन ३ आठवडे झाले नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा देण्याची वेळ

Cristiano Ronaldo: रोनाल्डो बापबेटा उतरणार फुटबॉलच्या मैदानात? सौदीच्या क्लबकडून एकत्र खेळण्याची चर्चा, नवा विक्रम ?

इलेक्ट्रिक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, डोकं चाकाखाली आल्याने मेंदू बाहेर; धक्कादायक घटना...

१९७० ते आजची 'जेन झी' पिढी! 'आमच्या पिढीची गोष्टच वेगळी' नाटकाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरलची धमकी देत ६८ लाखांची खंडणी उकळणारा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT