Young man arrested for attacking woman Nagpur crime news 
नागपूर

महिलेवर हल्ला करण्यासाठी जाणाऱ्या तरुणास अटक; आईसोबत भांडण केल्याचा राग

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : आईसोबत भांडण केलेल्या महिलेचा खून करण्यासाठी तलवार घेऊन जाणाऱ्या तरुणास नवीन कामठी पोलिसांनी वेळीच अटक केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. आरोपीस अटक केल्याची कारवाई शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास केली.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल ऊर्फ हरीश संतोष आमधरे (वय १९, रा. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेजवळ, घोरपड) हा शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तलवार व मोठी हातोडी घेऊन ड्रॅगन पॅलेस मार्गाने जोरजोराने ओरडत घोरपड येथील घराकडे जात होता. नवीन कामठी पोलिस ठाण्यातील डीबी पोलिस पथक गस्तीवर असताना पोलिसांनी हर्षल उर्फ हरीश संतोष आमधरे यास थांबवून कोठे जात असल्याचे विचारले.

घरासमोर राहणाऱ्या महिलेने माझ्या आईसोबत भांडण केल्याने तिचा खून करण्यासाठी जात असल्याचे सांगताच पोलिसांनी त्यास थांबवून मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला नवीन कामठी पोलिस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

घराची झडती घेतली असता २ मोठे लोखंडी चक्र, २ त्रीशूल, ७ लोखंडी भाले, ४ लोखंडी फरसे, ८ लोखंडी दांडपट्टा, २ मोठ्या लोखंडी तलवारी, २ लोखंडी राड असे एकूण २८ प्राणघातक हत्यार (शस्त्र) आढळले. त्याची किंमत २,३०० रुपये असून पोलिसांनी सर्व शस्त्रे जप्त करून आरोपी हर्षल उर्फ हरीश संतोष आमधरे यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT