नागपूर

पत्नीला माहेरी सोडून परतताना युवकाचा अपघात; लग्नाच्या दोन महिन्यातच झाली विधवा

सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि. नागपूर) : पत्नीला माहेरी सोडून गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या कारला मालवाहूने धडक (accident) दिली. या अपघातात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ घडली. प्रशीस हरिचंद्र उभाळे (२८, रा. वरूड, जि. अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Young man killed in car and truck accident)

काही महिन्याआधीच प्रशीसचा विवाह नागपूर येथील तरुणीशी विवाह झाला होता. शनिवारी प्रशीसने पत्नीला एमएच २७ एसी ९०८८ क्रमांकाच्या मारोती कारने माहेरी, नागपूरला सोडले. दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी नागपूर येथून वरूडला परतताना पारडसिंगा गावासमोरील पुलाजवळ पोहचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच २६ व्ही ४४५२ क्रमांकाच्या बोलेरो मालवाहूने कारला जबर धडक दिली.

या अपघातात प्रशीस गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती काटोल पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची माहिती प्रशीसच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ही माहिती प्रशिसच्या कुटुंबीयांना मिळताच हिरव्या मांडवात शोककळा पसरली. याप्रकरणी हरिचंद्र सूर्यभान उभाळे यांच्या तक्रारीवरून मालवाहू चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संसार ठरला औटघटकेचा

प्रशीसचा विवाह हा दोन महिन्यांआधीच झाला होता. पती-पत्नीने सुखी आयुष्याची स्वप्ने बघितली होते. मात्र, त्यांची ही स्वप्ने पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातल्याने त्यांचा संसार ठरला औटघटकेचा. ज्या घरात लग्नामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तेथे प्रशीसच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली.

(Young man killed in car and truck accident)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT