Young man Murder by stoning in pardi 
नागपूर

रक्‍ताने माखलेल्या मृतदेहामुळे पारडीत खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : युवकाचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून आरोपींनी पळ काढला. ही थरारक घटना पारडी पोलिस ठाण्यांतर्गत कापसी (खुर्द) आऊटर रिंग रोडवर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कापसी (खुर्द) नागपूर हैदराबाद आऊटर रिंग रोडवर एका 25 वर्षीय युवकाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. डोक्‍यावर दगडाने वार केल्याच्या गंभीर जखमा आहे. मृत युवकाची अद्याप ओळख पटली नाही. अनैसर्गिक कृत्यातून ही हत्येची घटना घडली असवी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात पारडी पोलिसांना नियंत्रण कक्षाने माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी पथकासह वेळीच घटनास्थळ गाठले. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्‍याच्या मागील बाजूला गंभीर जखम आहे. तर अंगावर एक टी शर्ट आणि जिन्स पॅन्ट असून, पॅन्ट अर्धा गुडघ्यापर्यंत खाली उतरलेला होता.

मृत आढळलेला युवकाचा पॅंट अर्धवट काढलेला आहे. अर्धनग्न अवस्थेत मृतदेह असल्यामुळे खून करण्यापूर्वी युवकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे कुणीतरी विकृतीतून हा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिकदृष्ट्या युवकाची अवस्था बघून कुणी मजूर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी पारडी पोलिसांनी तपास सुरू केला.

मृतक युवक कोण, हत्या कुणी आणि का? केली, याचे गूढ कायम आहे. याप्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील हत्याकांडाची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोनेगाव, हिंगणा आणि नंदनवननंतर आता पारडी पोलिस ठाण्यात हत्याकांड उघडकीस आले. गेल्या तीन दिवसांतील हे तिसरे हत्याकांड असून, यावरून शहरातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे–बंगळूर प्रवास आता फक्त सात तासांत! तब्बल 55 हजार कोटींचा नवा आठपदरी महामार्ग ठरणार गेमचेंजर, महाराष्ट्र-कर्नाटकातून जाणार मार्ग

Sugarcane Price Protest Video : कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाचा भडका, शिरोळ तालुक्यात ऊस वाहतुकीची तीन वाहने पेटवली

Solapur Accident:'भावी अभियंत्याचा दुचाकी अपघातात मृत्यू'; सुट्टीला आल्यावर मरवडे रोडवर घटना, वडिलांचे स्वप्न संपलं

"असिस्टंट दिग्दर्शक म्हणून सचिन यांचं नावंही शोलेच्या यादीत नाही" ज्येष्ठ सिनेसमीक्षकाचा धक्कादायक खुलासा

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा'; उर्वरित ४७ टक्के शेतकऱ्यांच काय?

SCROLL FOR NEXT