The younger brother was injured in the attack 
नागपूर

बाप करीत होता मुलीला मारहाण; काकाने मध्यस्ती केली असता घडला हा थरार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहरातील जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला मारहाण करीत असलेल्या वडिलांना भावाने टोकल्यामुळे आरोपीने भावालाच गंभीर जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फेब्रुवारीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास गजर वनवास शेंडे (रा. जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत जुना जरीपटका, इटारसी पुलिया झोपडपट्टी) हा मुलगी दामिणीला मारहाण करीत होता. त्याचा भाऊ धरम शेंडे यांनी त्याला टोकले.

तेव्हा आरोपीने त्याला मारण्यासाठी बल्ली आणली. तेव्हा भाऊ राजेश शेंडे हा मध्ये आला. यावेळी राजेश शेंडेला डोक्यावर मारून जखमी केले. तसेच गं. भा. नंदाबाई वनवास शेंडे (वय ४०) या मध्ये पडल्या असता त्यांनासुद्धा मारून जखमी केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अशाच प्रकारचा एक गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे. कोलबा स्वामी चौक, विष्णू कॉम्पलेक्स मागे, जुनी मंगळवारी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी रोहित नरेंद्र नांदेकर (वय ३०) व आरोपी महादेव नामदेव पौनीकर (वय ३९, रा. तांडापेठ, लाडपुरा, नंदगोरी रोड, नागपूर) हे नातेवाईक असून एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घरी हजर असताना आरोपी हा फिर्यादी यांच्या घरी आला.

माझ्या पत्नीला फोन करून का शिवीगाळ केली, असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT