youth died in bike and nilgai accident in nagpur  
नागपूर

घरी जायला निघाला, पण वाटेत नीलगायीचे शिंग घुसले गळ्यात; तरुणाचा मृत्यू

अनिल कांबळे

नागपूर : भरधाव दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर उभ्या असलेल्या नीलगायीला धडकला. नीलगायीचे शिंग तरुणाच्या गळ्यात घुसले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. राहुल पुरुषोत्तम डांगरकर (३०, परदाशी, धापेवाडा, कळमेश्‍वर), असे मृत तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल डांगरकर हा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीने घरी जात होता. लोणारा रोड, विटाभट्टीजवळून भरधाव जात असताना अचानक रस्त्यावर नीलगाय उभी झाली. राहुललाही काय करावे सुचले नाही. त्याने करकचून ब्रेक दाबले. परंतु ,तो नीलगायीवर जाऊन धडकला. नीलगायीने दुचाकीकडे मान केल्यामुळे तिचे शिंग राहुलच्या गळ्यात घुसले. त्याच्या गळ्यातून रक्त वाहत असतानाच मागून आलेल्या वाहनचालकांनी त्याला रुग्णालयात पोहोचवले. मात्र, सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

पत्नीवर प्राणघातक हल्ला -
घराचे भाडे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीचे डोके फोडले. याप्रकरणी पोलिसांनी मिसाळ लेआऊट निवासी वर्षा बागडे (३५) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी पती कन्हैया ध्रुवदास बागडे (३५) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घर भाडे देण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. बराच वेळपर्यंत दोघांची बाचाबाची सुरू होती. दरम्यान, कन्हैयाने घरात ठेवलेला दंडा उचलून वर्षावर हल्ला केला. डोक्यावर आणि हातावर मारून गंभीर जखमी केले. वर्षाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी कन्हैया विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल; राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातला ट्रम्पचा एडव्हायझर नेमला असता- देवेंद्र फडणवीस

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

SCROLL FOR NEXT