Marriage Sakal
नागपूर

कोरोनामुळं बदलतंय जीवन, आता लग्नसराईत 'यू-ट्यूब लाईव्ह'चा ट्रेंड

केतन पळसकर

नागपूर : लग्नसराईमध्ये छायाचित्र, प्री-वेडिंग, व्हिडिओ शूटिंग आदी बाबीला आजवर मागणी असायची. मात्र, लॉकडाउनमुळे (lockdown) लग्न सोहळ्याला मर्यादा आल्यानंतर फोटोग्राफरकडून यू-ट्यूब लाइव्ह करून घेण्याचा ट्रेंड (youtube live in marriage ceremony) सुरू झाला आहे. (youtube live trend in marriage ceremony due to corona)

साक्षगंध, हळद, लग्न, वाढदिवस, मुंज अशा विविध पारिवारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आठवण म्हणून छायाचित्रकार क्षणचित्रे टिपतात. या कार्यक्रमामध्ये छायाचित्र आणि व्हिडिओ शूटिंग यावर मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते. तसेच, या व्यवसायाला प्रतिष्ठा देखील आहे. त्यामुळे, अनेक बेरोजगार युवकांसाठी छायाचित्र हा मुख्य व्यवसाय आहे.

कधी काळी दहा-दहा हजार लोकांच्या उपस्थितीचे सोहळे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणाऱ्यांवर आज २५ जणांना टिपायची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळे सहाजिकच छायाचित्रकारांचे उत्पन्न घटले आहे. परंतु, मर्यादेत पार पडलेल्या लग्नसोहळ्यांना आपल्या आप्तेष्टांना निमंत्रण देणे शक्य न झाल्याने यू-ट्यूब लाईव्ह’द्वारे त्यांना सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतल्या जात आहे. लॉकडाउनमुळे या व्यवसायावर उतरती कळा आली असताना या ट्रेंडमुळे थोडा-थोडका का होईना दिलासा मिळतो आहे.

  • सरासरी उत्पन्न - १० ते १२ लाख (प्रत्येकी)

  • विदर्भातील फोटोग्राफर - १५ हजार

  • वार्षिक नुकसान - १ हजार ५०० कोटी

पंधरा हजार छायाचित्रकार अडचणीत - उन्हाळ्यामधील लग्नाचे मुहूर्त म्हणजे छायाचित्रकारांसाठी वर्षभराची पुंजी गोळा करण्याचा काळ असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मारवाडी समाजाचे आणि मार्च ते मे या महिन्यांमध्ये महाराष्ट्रीयन समाजाचे लग्न असतात. शासनाच्या निर्बंधामुळे हा संपूर्ण सीझन रिकामा गेला. यामुळे, विदर्भातील पंधरा हजार फोटोग्राफर अडचणीत आले असून पंधराशे कोटींचे नुकसान झाले आहे.
-चेतन जोशी, ऑरेंज सिटी फोटोग्राफर असोसिएशन, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

High-Protein Recipes: दिवसाची सुरुवात एनर्जीने करा! 10 मिनिटांत बनवा हेल्दी अन् टेस्टी 'स्प्राऊट्स पोहे'

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026

अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

झोपेची पद्धत आणि कणा

SCROLL FOR NEXT