corona. 
नागपूर

नागपूर झेडपी अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह!

राजेश चरपे

नागपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत चालले असून नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या पतीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते रोजच जिल्हा परिषदेचा फेरफटका मारतात. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली आहे.

जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोरोनाचे रुग्ण आहेत. आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले नाहीत तर पुन्हा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. महापौर संदीप जोशी यांनीसुद्धा आयुक्तांच्या इशाऱ्याला सहमती दर्शवली आहे. मात्र लॉकडाऊनपूर्वी पदाधिकारी आणि नागरिकांना विश्‍वासात घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याकरिता महापौरांनी बुधवारपासून जनजागृती दौरा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या कारागृहात एकाच दिवशी तब्बल शंभर रुग्ण आढळले होते. मंगळवारी जिल्ह्यात सुमारे 147 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलावंताना याची लागण झाली. मंत्री, बड्या अधिकाऱ्यांनाही याची लागण झाली असून कोरोनाने जिल्हा परिषदेत सुद्धा शिरकाव केला आहे. अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अनेक दिवसांपासून विशेष सभेची मागणी करीत आहेत. शहरातील सुरेश भट सभागृहात सभेसाठी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र महापालिकेने ती फेटाळून लावली. त्यानंतर देशपांडे सभागृहात सभा घेण्याचे निश्‍चित झाले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सभा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा सभेबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

यापूर्वी शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जवळपास 50 अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. आता जि. प. अध्यक्षांच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल आहे. अध्यक्षांचे पती जिल्हा परिषद कार्यालयातच असत. अनेक बैठकांच्या वेळी ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. अध्यक्षांच्या कार्यालयात सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांची वर्दळ राहते. त्यामुळे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. उपाध्यक्ष मनोहर कुंभारेसह जवळपास 10 ते 20 जणांची वैद्यकीय तपासणी झाली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाकडून लपवाछपवी
अध्यक्षांच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला याची माहिती होती. परंतु त्यांच्याकडून ती लपवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता मोठा उद्रेक झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT