भिवापूर (जि.नागपूर) : वेळ सायंकाळी सव्वा सहाची, नगर पंचायत कर्मचारी हातात दंडूके घेऊऩ बाजारात आले. अचानक विक्रीस समोर ठेवलेली पालेभाजी, वांगी, कोबी, पपई आदी साहित्य फेकणे सुरू केले. दुकानदारांनी त्यांची बाजू सांगण्यास सुरूवात केली. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. एवढ्यावरच कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. हातात असलेल्या दंडूक्याने त्यांना बेदम मारणे सुरू केले. काय भानगड झाली या अविर्भावात सगळे बघत राहिले.
वडिलांचा रोजगार हिरावला म्हणून उद्योग
नियोजित वेळ उलटूनही दुकान बंद न केल्याने संतापलेल्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रेत्यास जबर मारहाण करुन दुकानातील सामान फेकून दिल्याची घटना शनिवारी येथील भाजीबाजारात घडली. घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून
कर्मचाऱ्यांच्या या कृतीबद्दल येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुनिल कलसे व भगवान वाघमारे अशी आरोपी नगरपंचायत कर्मचाऱ्यांची तर समीर मालोदे (वय१५) व किशोर देव्हारे (वय३५) अशी पिडीत भाजीविक्रेत्यांची नावे आहेत. कोरोनामुळे वडिलांचा रोजगार हिरावल्याने समीर हा भाजीपाला विकून कुटुंबाच्या भरणपोषणास मदत करतो. रोजगाराचे अन्य साधन नसल्याने किशोर हासुद्धा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. येथील रामधन चौकात भरणाऱ्या गुजरीत दोघेही दुकान लावतात. शनिवारी (ता.१२)सायंकाळी सवा सहा वाजताच्या सुमारास न. पं. कर्मचारी सुनिल कलसे व भगवान वाघमारे हे त्यांच्या दुकानात आले व दुकान का सुरू ठेवले, म्हणून धमकावण्यास सुरूवात केली. ग्राहक असल्याने उशीर झाल्याचे सांगत समीर व किशोर यांनी दुकानाची आवराआवर सुरू केली. परंतू त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या सुनिल कलसे याने शिवीगाळ करीत दुकानातील टमाटर क्रेट, वांगे, कोबी, पपई आदी सामान रस्त्यावर फेकण्यास सुरूवात केली. काही भाजीपाला बाजूने वाहणाऱ्या नालीतसुद्धा फेकण्यात आला. महागाच्या भाजिपाल्याची केली जात असलेली नासधूस पाहून न झाल्याने समीरने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतू संतापलेल्या भगवान वाघमारे याने त्याला हातबुक्याने जबर मारहाण केली. यात समीरला छातीत दुखापत झाल्याचे समजते.
अधिक वाचाः सावधान! नागपूर जिल्ह्यतील गावे पार हादरली, कारण आहे हे…
आज होणार भाजीविक्रेत्यांचे आंदोलन
या घटनेने भाजीपाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान संतप्त भाजीविक्रेत्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची तक्रार नोंदवली. मारहाण व दुकानातील सामानाची नासधूसस करून छोट्या व्यवसायीकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी नगर पंचायत कार्यालयासमोर भाजीविक्रेत्यांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजीविक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.
नासधूस करणे हे पूर्णत: अनुचित
नियोजित वेळेत दुकान बंद न करणाऱ्या व्यापा-यांविरुद्ध दंड आकारण्याचे किंवा पोलिस कारवाई करण्याचे नगर पंचायत प्रशासनाला अधिकार आहेत. परंतू मारहाण किंवा सामानाची नासधूस करणे हे पूर्णत: अनुचित आहे.
लव जनबंधु
नगराध्यक्षसंपादनः विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.