File photo
File photo 
विदर्भ

एकमेकांवर धावून गेले नगरसेवक

वृत्तसंस्था

नागपूर : महापालिका सभागृहात भविष्यातील पाणीटंचाईवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, बसप नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याने गोंधळ उडाला. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मध्यस्थी केल्याने सभागृहात फ्रिस्टाइल टळली. पाण्याविषयी सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर नंदा जिचकार यांनी 3 नोव्हेंबरला सविस्तर चर्चेसाठी विशेष सभेची घोषणा केली.
महाल येथील नगरभवनात पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व कॉंग्रेस सदस्य मनोज सांगोळे यांनी सध्या पाण्याची स्थिती, कमी साठा असल्याने करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रश्‍न उपस्थित केले. एका बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी संभाव्य पाणीटंचाईवरून दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात आले काय? काय उपाययोजना केल्या? असा प्रश्‍न तानाजी वनवे यांनी उपस्थित केला. सांगोळे यांनी सध्या पाण्याची स्थिती काय आहे? असा प्रश्‍न केला. हर्षला साबळे यांनी दूषित पाणी येत असल्याकडे लक्ष वेधले. झुल्फीकार भुट्टो यांनी पाणीटंचाईच्या काळात अंबाझरीचे पाणी वापरण्याबाबत सल्ला देत उपाययोजनांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. कमलेश चौधरी व बसप सदस्य जितेंद्र घोडेस्वार यांनीही प्रशासनावर रोष व्यक्त केला. घोडेस्वार यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी बाकावरील सदस्य दीपक चौधरी यांनी पाण्यासाठी हवन करावे, अशी सूचना केली. यावर बसप व कॉंग्रेस सदस्य संतप्त झाले. ते थेट महापौरांच्या आसनापुढे गोळा झाले. त्यामुळे दीपक चौधरीही त्या दिशेने झेपावले. येथे बसपचे घोडेस्वार व भाजपचे चौधरी एकमेकांवर धावून गेले. कॉंग्रेसचे नितीन साठवणे व इतर सदस्यही धावून गेले. सदस्यांमध्ये फ्रिस्टाईल होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, यावेळी येथे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना वेगवेगळे करून आपापल्या आसनावर बसण्यास सांगितले. त्यामुळे पालिकेची नामुष्की टळली.
डेंगीप्रश्‍नी प्रशासन कोंडीत, कारवाईचे निर्देश
विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी नोटीसद्वारे डेंगीवर चर्चेच्या प्रस्तावावर सत्ताधारी व विरोधी बाकावरील नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच कोंडीत पकडले. नागरिकांचे जीव जात असूनही प्रशासन झोपेत असल्याचा आरोप वनवे यांनी केला. प्रशासनाने मात्र डेंगीने मृत्यू झाल्याचे स्पष्ट नाकारले. उपायुक्त राम जोशी यांनी यावेळी 203 नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याचे मान्य केले. मात्र, सत्ताधारी बाकावरील डॉ. रवींद्र भोयर यांनी पॅथॉलॉजिस्टच्या एका बैठकीचा हवाला देत त्यात सक्करदरा भागात मोठ्या प्रमाणात डेंगीचा उद्रेक असल्याचे सांगितले. मात्र, मलेरिया, फायलेरिया विभागाच्या जयश्री थोटे यांनी गांधीबाग झोनमध्ये डेंगीचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगितले. यावरून डॉ. भोयर यांनी प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. वनवे यांनी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी केली. यावर प्रभारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. यावर सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT