यवतमाळ - विचार व्यक्त करताना माजी खासदार नाना पटोले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
यवतमाळ - विचार व्यक्त करताना माजी खासदार नाना पटोले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. 
विदर्भ

मी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले - नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ घोषणेचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आव्हान दिले होते. हे आव्हान मी स्वीकारले असून कुठेही चर्चेसाठी तयार आहे, असे प्रतिआवाहन माजी खासदार तथा काँग्रेसचे राज्य प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांनी दिले.

ते आज येथे आयोजित काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार राजीव सातव, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. वझाहत मिर्झा, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई आदी उपस्थित होत्या. 

पटोले म्हणाले की, सरकार दबावतंत्राचा वापर करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. गरिबांचे प्रश्‍न आम्ही सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगत आहेत. माझ्या मते देशात दोनच गरीब आहेत. एक अदानी तर दुसरे अंबानी, असेही नाना पटोले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT