File photo
File photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 जहां नाना वहीं जाना, मोदी यांची साकोलीत जाहीर सभा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या मतदारसंघात आता मोदी आपल्या भाषणातून त्यांचा कसा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसचे आमदार असताना पटोले यांनी राजीनामा देऊन भाजपात दाखल झाले होते. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, खासदार झाल्यानंतर वर्षभरात त्यांचे पक्ष नेतृत्वाशी खटके उडायला लागले. मोदी अहंकारी आहेत, खासदारांचे म्हणणे ऐकून घेत नाही, शेतकऱ्यांसोबत त्यांना काही देणेघेणे नाही, असे जाहीर आरोप करणे त्यांनी सुरू केले होते. भाजपातील मोदी विरोधक असलेले यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्या कंपूत ते दाखल झाले. अकोला येथील "कासोधा' संमेलनात सहभागी होऊन त्यांनी केंद्रासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करणे सुरू केले. महाराष्ट्रातील नेत्यांची मोदी यांच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही, असेही आरोप त्यांनी सुरू केले होते.
विशेष म्हणजे नानांच्या आरोपांची सुरुवात नागपूर येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमातून झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत मंचावर राज्यमंत्री परिणय फुके उपस्थित होते. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून फुके यांना निवडून आणण्यात नाना पटोले यांची भूमिका महत्त्वाची होती. आता फुके यांनाच भाजपने साकोलीतून उमेदवारी देऊन त्यांच्या विरोधात उभे केले आहे.
त्यानंतर नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेत कॉंग्रेसने त्यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवारी दिली. मात्र, पटोले यांना गडकरींवर मात करता आली नाही. त्यामुळे ते पुन्हा आपल्या स्वगृही परतले आहेत. नाना पटोले यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत झुंजावे लागले. उमेदवारी दाखल करायच्या आदल्या रात्री त्यांना उमेदवारी देण्यात आली. येथून पहिली पसंती माजी आमदार सेवक वाघाये यांना होती. त्यामुळे नाराज झालेल्या वाघाये यांनी बंड पुकराले आहे. वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत. दुसरीकडे भाजपने उमेदवारी नाकारल्याने आमदार राजेश काशीवर यांनीही बंडखोरी केली आहे. त्यामुळे येथील लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT