hrd 
विदर्भ

अभिनंदनीय! अमरावतीच्या शिक्षकांच्या कार्याला राष्ट्रीय 'बहुमान'

श्रीनाथ वानखडे

मांजरखेड (जि. अमरावती) : कोविड प्रादुर्भाव कालावधीत काही शिक्षकांनी विविध छंदासोबत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुद्धा घडवून आणले. अशा सर्व शिक्षकांना एकत्रित घेऊन प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती यांनी 93 हजार विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण दिले.

या शैक्षणिक कार्याची केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे प्रकाशित इंडिया रिपोर्ट डिजिटल एज्युकेशन या अहवालात दखल घेण्यात आली असून संर्पूण राज्यातून अमरावतीच्या कार्याचा उल्लेख केला आहे.

त्यामुळे अमरावतीच्या शिक्षकांच्या कार्याला राष्ट्रीय 'बहुमान' मिळाला आहे.
देशातील 36 राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे मुक्त शिक्षण होण्याच्या दृष्टीने ज्यांनी पुढाकार घेतला अशा शिक्षणसंस्था, एनजीओच्या कार्याचा उल्लेख इंडिया रिपोर्ट डिजिटल एज्युकेशन मध्ये केला आहे.

या मध्ये राज्यातील शिक्षण विभागातील शिखर संस्था असलेल्या विद्या परिषदेच्या (एससीईआरटी) कार्यासह अमरावतीच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणचा उल्लेख आहे. मार्च महिन्यात शाळा बंद झाल्यानंतर काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू राहावे म्हणून कोणी प्रश्न निर्मिती करून गुगल फार्म द्वारे विद्यार्थी व पालकांना पाठवले, तर कोणी प्रत्यक्ष विज्ञानाचे प्रयोग दाखवले, काही शिक्षकांनी मराठीच्या कथा, कविता बाहुली नाटिकेद्वारा पोहचविल्या, तर कोणी यु-ट्यूबद्वारे गणित पेटीतील साहित्याद्वारे मनोरंजनासह गणित शिकवले.

प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीने अशा 916 शिक्षकांना एकत्रित आणत त्यांच्या माध्यमातून 93 हजार विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणाची मेजवानी उपलब्ध करून दिली. सोबतच साडे तीन हजारांवर शिक्षकांना तंत्रस्नेहीचे प्रशिक्षण दिले आहे. या संस्थेद्वारा निर्मित एलओ स्मार्ट क्‍यूऍप मधील प्रश्न सोडवून सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी स्वयं मूल्यमापन केले. राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित या अहवालात प्रादेशिक विद्या प्राधिकरण निर्मित एलओ स्मार्ट क्‍यू या ऍपसह केलेल्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख केलेला आहे.

हा तर शिक्षकांचा सन्मान
राष्ट्रीय स्तरावर अमरावती जिल्ह्यातील कामाची नोंद घेणे ही गौरवाची बाब आहे. ही सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाची पावती असून एकप्रकारे त्यांचा सन्मान आहे. असे मत प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी व्यक्त केले.
संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT