Navegaon-Nagzira tourism.jpg 
विदर्भ

सोयीसुविधांच्या अभावामुळे नवेगाव-नागझिरा पर्यटन "लॉकडाउन', एक ऑक्‍टोबरपासून होणार पर्यटकांसाठी खुले 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे 105 दिवसांपासून बंद असलेले पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुले झाले. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या पर्यटनावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे एक ऑक्‍टोबरपर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प "लॉकडाउन' राहणार आहे. 

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात निसर्ग पर्यटनाला बंदी घातली होती. हा काळ नेमका पर्यटनासाठी महत्त्वाचा असतो. या बंदीमुळे हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला तर वन्यजीव विभागाच्या महसुलाचेही बरेच नुकसान झाले. याशिवाय पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक लोकांच्या रोजगार हिरावला गेला. 

देशात आणि राज्यामध्ये काही प्रमाणात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने व्याघ्रप्रकल्पातील निसर्ग पर्यटन मर्यादित स्वरूपात सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात 1 जुलैपासून पर्यटनाला सुरुवात झाली आहे. केवळ बफर क्षेत्रात मर्यादित स्वरूपात पर्यटनाला परवानगी देण्यात आली.

या निर्णयामुळे भंडारा-गोंदियातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनही सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, या प्रकल्पात कोविड 19 साठी आवश्‍यक सोयीसुविधा नसल्याने याठिकाणी तूर्तास तरी पर्यटन सुरू करणे शक्‍य होणार नाही, असे वन्यजीव विभागाचे स्पष्ट केले आहे. या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन पावसाळ्यानंतर 1 ऑक्‍टोबरपासून नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. 


उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य खुले 
राज्यात अनलॉक-2 सुरू झाल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे नियम पाळून पर्यटकांना पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT