नवेगावबांध : येथून जाणाऱ्या सहा युवकांना जेवण देताना मित्र परिवाराचे कार्यकर्ते. 
विदर्भ

दिलासादायक! नवेगावबांधच्या मित्रपरिवाराने तीन हजार मजुरांची शमवली भूक

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध (जि. गोंदिया) : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये मजुरीसाठी गेलेले नागरिक लॉकडाउनमुळे अडकले होते. सर्वच वाहतूक व्यवस्था बंद असल्याने आता आपल्या गावाकडे जाण्यासाठी मजूर पायीच निघाले आहेत. नवेगावबांध येथून शेकडो कामगार, मजूर पायी जाताना दिसल्याने त्यांच्या भोजनाची व नाश्‍त्याची व्यवस्था येथील मित्रपरिवार व सावजी चचाने भोजनालयाने केली आहे.

लॉकडाउनमुळे उपाशीपोटी पायी जाणाऱ्या कामगारांना चहा, नाश्‍ता, पाणीसुद्धा मिळत नव्हते. अशा परिस्थितीत नवेगावबांध येथील सामाजिक कार्यकर्ते नवलकिशोर चांडक, अनिल जैन, शैलेश जयस्वाल, बंटी गुप्ता, विलास कापगते, स्थानिक तलाठी कुंभरे, ग्रामसेवक जनबंधू, स्थानिक पत्रकार मंडळी व सावजी भोजनालयाचे संचालक माधव चचाने यांच्या पुढाकाराने सर्वांना नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

45 व्यक्तींना मध्य प्रदेश सीमेपर्यंत सोडले

गेल्या 29 मार्चला रेल्वेरुळाने पायी जाणाऱ्या छत्तीसगड येथील 56 मजुरांना जेवणाची व्यवस्था रेल्वेस्टेशनवरच करण्यात आली; तर बीएड विद्यालयात असलेल्या विलगीकरण कक्षातील 28 लोकांच्या जेवणाची व्यवस्था नवेगावबांध मित्रपरिवारातर्फे करण्यात आली आहे. 25 एप्रिलला 45 व्यक्ती मध्य प्रदेशात पायी जात होते. त्यांना थांबवून, चहा, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था करून सर्व 45 व्यक्तींना मित्र परिवाराच्या वतीने ट्रकची व्यवस्था करून मध्य प्रदेश बॉर्डरपर्यंत सोडून देण्यात आले.

सहा युवकांची मिटवली भूक

25 मे रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून पायी निघालेल्या सहा युवकांना नवेगावबांध येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आजपर्यंत नवेगावबांध येथील मित्रपरिवार व सावजी भोजनालयाच्या वतीने तीन हजार कामगारांना जेवण व नाश्‍त्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

नवेगावबांध येथे छत्रपती शिवाजी चौकातील सुरक्षाकर्मींना चहा, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्थासुद्धा समितीच्या वतीने पुरवण्यात आलेली आहे. ही व्यवस्था सुरळीत सुरू असून शासनाच्या सर्व प्रकारच्या नियम व अटींचे पालन करून केली जात आहे, असे सामाजिक कार्यकर्ते नवलकिशोर चांडक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT