Navneet Rana Navneet Rana
विदर्भ

VIDEO : खासदार नवनीत राणा धावण्यातही अव्वल; महिलांना दिला सल्ला

चूल व मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : धावण्याच्या शर्यतीत भाग घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रविवारी अव्वल क्रमांक (Navneet Rana also leads in running) पटकावला. राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून व्यायाम करावा, असा सल्लाही दिला. (Navneet Rana also leads in running)

महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चूल व मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला कलंत्री, रेशू खंडेलवाल, राधिका अटल, मनीषा अग्रवाल, शीतल ओझा, सोनाली राठी, नेहा जैन, शिवानी शर्मा, पूजा जोशी, राधिका खेतान आदींसह राजस्थानी महिला हितकारक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.

राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या वतीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महिलांसाठी रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी स्वतः सहभाग घेतला. इतर स्पर्धकांसोबत खासदार राणा देखील धावल्या (Won the running competition) आणि स्पर्धा (Navneet Rana also leads in running) जिंकली. हा व्हिडिओ शेअर करीत त्यांनी महिलांना फिटनेसबाबत सल्ला दिला आहे.

महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून व्यायाम करावा व स्वतःला सुदृढ ठेवावे.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT